शहीद औरंगजेबचे वडील भाजपामध्ये होणार सहभागी, मोदींच्या उपस्थितीत करणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 08:56 AM2019-01-31T08:56:44+5:302019-01-31T08:59:14+5:30

शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलेल्या शहीद औरंगजेबचे वडील मोहम्मद हनिफ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

martyr aurangzeb father will be join bjp | शहीद औरंगजेबचे वडील भाजपामध्ये होणार सहभागी, मोदींच्या उपस्थितीत करणार प्रवेश

शहीद औरंगजेबचे वडील भाजपामध्ये होणार सहभागी, मोदींच्या उपस्थितीत करणार प्रवेश

Next
ठळक मुद्देशौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलेल्या शहीद औरंगजेबचे वडील मोहम्मद हनिफ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. पंपंतप्रधान नरेंद्र मोदींची 3 फेब्रुवारीला जम्मूमध्ये एक महारॅली होणार आहे. या रॅलीदरम्यान मोहम्मद हनिफ भाजपात सामील होणार आहे.

जम्मू-काश्मीर- शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलेल्या शहीद औरंगजेबचे वडील मोहम्मद हनिफ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 3 फेब्रुवारीला जम्मूमध्ये एक महारॅली होणार आहे. या रॅलीदरम्यान मोहम्मद हनिफ भाजपात सामील होणार आहे. रायफलमॅन औरंगजेब हा जवान 14 जून 2018 रोजी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाला. त्यानंतर औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र देण्यात आलं.

औरंगबेज यांच्या शौर्याचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा शौर्य चक्र देऊन सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला याबद्दलची घोषणा झाली होती. जम्मू-काश्मीरमध्ये औरंगजेब यांना वीरमरण आलं होतं. ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला त्यांचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला होता.

ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेतलेल्या औरंगजेब यांनी घरी जाण्यासाठी लष्करी तळावरुन टॅक्सी पकडली होती. ते दक्षिण काश्मीरच्या शोपियानचे रहिवासी होते. शोपियानला जात असलेल्या औरंगजेब यांची टॅक्सी दहशतवाद्यांनी कालम्पोरा गावाजवळ अडवली आणि त्यांचं अपहरण केलं. याची माहिती टॅक्सी चालकानं पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आणि लष्करानं संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी औरंगजेब यांचा मृतदेह कालम्पोरापासून 10 किलोमीटर अंतरावर आढळून आला. दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली होती. औरंगजेब जम्मू-काश्मीर लाईट इन्फंटरीच्या शादीमार्ग येथे असलेल्या 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते. 

Web Title: martyr aurangzeb father will be join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.