पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या गावी दु:खवटा; गावात साजरी केली नाही ईद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 06:10 AM2023-04-23T06:10:02+5:302023-04-23T06:12:02+5:30
पुंछ हल्लाप्रकरणी १४ ताब्यात; संगियाेतेमध्ये ‘ईद’ साजरी नाही
पुंछ/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात अतिरेकी हल्ला घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही नाकेबंदी राबविण्यात आली. ड्रोन आणि श्वानपथकांची मदत त्यासाठी घेतली जात आहे. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. याप्रकरणी १४ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीसाठी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. प्राथमिक चौकशीनुसार, सीमेवरील संगियोते गावातील इफ्तारसाठी भीम्बर गली तळावरून फळे व अन्य साहित्य घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. लष्कराच्या राष्ट्रीय राइफल्स युनिटने या इफ्तारचे आयोजन केले होते.
गावकऱ्यांनी साजरी केली नाही ईद
संगियोते गावचे गावकरी सुन्न झाले आहेत. शनिवारची ईद साजरी न करण्याचा निर्णयही गावाने घेतला. गावकऱ्यांनी केवळ नमाज अदा केली.
कारगिल शहिदाच्या सुपुत्राने लावली प्राणांची बाजी
पुंछमधील हल्ल्यात शहीद झालेले कुलवंत सिंग यांचे वडील बलदेव सिंग हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. २४ वर्षांनंतर त्यांचे पुत्र कुलवंत सिंग देशसेवा करताना
शहीद झाले.