हीच खरी देशभक्ती! गलवानमध्ये पती शहीद, आता पत्नी सीमेवर चिनी सैनिकांचा बदला घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 07:55 PM2023-04-29T19:55:03+5:302023-04-29T19:56:14+5:30
'हा एक कठीण निर्णय होता, पण माझ्या पतीने जे काही केले ते मला अनुभवायचे होते आणि मला जायचे होते, असंही लेफ्टनंट रेखा सिंह म्हणाल्या.
भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील संघर्षात नाईक दीपक सिंग शहीद झाले होते. आणि आता त्यांची पत्नीही सैन्यात भरती झाली आहेत. लेफ्टनंट रेखा सिंह यांची पूर्व लडाखमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. एलएसी येथे लष्कराची उपकरणे, आणि दारूगोळा यांच्या पुरवठा साखळीवर त्या देखरेख ठेवणार आहेत.
Corona Update: कोरोना व्हायरसचा कहर कधी संपणार? तज्ज्ञांनी दिला मोठी अपडेट
दिवंगत नाईक दीपक सिंह यांच्या पत्नी लेफ्टनंट रेखा सिंह यांची शनिवारी लष्करी आयुध कोअरमध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, यामध्ये युद्धाच्या वेळी लष्कराला साहित्य आणि लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याची जबाबदारी असते.लष्कराच्या बिहार रेजिमेंटमधील नर्सिंग सहाय्यक नाईक दीपक सिंग यांना २०२१ मध्ये मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई येथे शनिवारी पासिंग आऊट परेडमध्ये लेफ्टनंट रेखा सिंह म्हणाल्या की, कमिशनिंग हा त्यांच्या आणि तिच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. अकादमीमध्ये ११ महिन्यांपासून त्या आर्मी कॅडेट म्हणून कठोर प्रशिक्षण घेत आहेत. या समारंभाला लेफ्टनंट जनरल अदोष कुमार, कर्नल कमांडंट आणि तोफखान्याचे महासंचालक आणि नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.
रेखा सिंह म्हणाल्या, “माझे पती कुठेही असले तरी त्यांना अभिमान वाटत असेल. हा एक कठीण निर्णय होता, पण माझे पती ज्या गोष्टीतून जात होते त्या सर्व गोष्टी मला अनुभवायच्या आणि त्यामधून जायचे होते. म्हणून मी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला."
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेखाला पूर्व लडाखमधील एलएसीजवळ फ्रंटलाइन तळावर तैनात केले जाईल. या आठवड्याच्या सुरुवातीला एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या चिनी समकक्षासोबत द्विपक्षीय बैठकीदरम्यान तणाव देखील अधोरेखित केला होता.
दीपक सिंह बिहार रेजिमेंटच्या १६ व्या बटालियनमध्ये तैनात होते. ते २०१२ मध्ये सैन्यात दाखल झाले आणि जानेवारी २०२० मध्ये लडाखमध्ये तैनात झाले. पाच महिन्यांनंतर, जूनमध्ये, चिनी सैनिकांशी चकमक झाली, यात ते शहीद झाले. दीपकने हौतात्म्यापूर्वी केवळ ८ महिने आधी रेखा सिंह यांच्यासोबत लग्न केले होते, अशी माहिची अधिकाऱ्यांनी दिली.