अनंतनागमध्ये कर्नल, मेजर, डीएसपी यांना हौतात्म्य, दहशतवादी संघटना TRF नं स्वीकारली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:15 AM2023-09-14T01:15:04+5:302023-09-14T01:17:57+5:30
या चकमकीची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये बुधवारी (13 सप्टेंबर) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन अधिकाऱ्यांना हौतात्म्य आले. हौतात्म्य आलेल्या जवानांमध्ये दोन सेन्याधिकारी आणि एका जम्मू-कश्मीर पोलिसातील (Jammu Kashmir Police) अधिकाऱ्याचा समावेश आहे. भारतीय सैन्य दलातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सेन्य दलातील कर्नल आणि मेजर, तसेच जम्मू-कश्मीर पोलिसांतील डीएसपीने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. या चकमकीची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
कर्नल, मेजर आणि डीएसपीला हौतात्म्य -
संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे की, राष्ट्रीय रायफल्स (आरआर) युनिटचे कमांडिंग कर्नल मनप्रीत सिंग, आरआर के मेजर आशीष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांतील उपाधीक्षक हुमायूं भट्ट हे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शोध मोहीम सुरू राहणार -
संबंधित परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाटी विषेश दल तैनात करण्यात आले आहे. येथी किमान 3 ते 4 दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे. ही शोध मोहीम रात्रभर सुरूच राहणार आहे.
राजौरीमध्येही चकमक
दरम्यान, मंगळवारी दुपारपासून राजौरीतील नारला भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत, तर एक जवान आणि एक स्निफर डॉग शहीद झाला. याशिवाय तीन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. 45 दिवसांत राजौरी आणि पुंछ भागात भारतीय लष्कराने आतापर्यंत 20 दहशतवाद्यांना ठार केले आहे. बहुतांश दहशतवादी पाकिस्तानी होते. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.