जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला

By Admin | Published: February 20, 2016 04:58 PM2016-02-20T16:58:59+5:302016-02-20T20:08:01+5:30

जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला बसला असून सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर मारुती सुझूकीने हरियाणामधील मानेसर आणि गुडगांवमधील उत्पादन प्रक्रिया थांबवली आहे

Maruti Suzuki strikes Jat agitation | जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला

जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
 
नवी दिल्ली, दि. 20 - जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला बसला असून सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर मारुती सुझूकीने हरियाणामधील मानेसर आणि गुडगांवमधील उत्पादन प्रक्रिया थांबवली आहे. जाट आरक्षणाच्या मुद्यावरुन गेले काही दिवस हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. ज्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मारुती सुझूकीने सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला आहे. 
 जाट आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. रोहतक आणि जवळच्या परिसरात सुरु असलेल्या आंदोलनामुळे मारुती सुझूकीला कोणत्याही प्रकारची आयात - निर्यात करण शक्य होत नाही आहे. यामुळेच त्यांनी आज दुपारपासून मनेसर आणि गुडगांमधील उत्पादन प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपासाठी थांबवली आहे. मारुती सुझूकीने प्रसिद्धीपत्र जारी करुन ही माहिती दिली आहे. 
  मनेसर आणि गुडगांमध्ये मिळून दिवसाला 5 हजार गाड्यांच उत्पादन केलं जात. मात्र उत्पादन प्रक्रिया ठप्प पडल्यामुळे मारुती सुझूकला खुप मोठं नुकसान होणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाईल अशी माहितीदेखील प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 
 
फोटो सौजन्य - एएफपी

Web Title: Maruti Suzuki strikes Jat agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.