मार्क्सवादी नेत्याला घरफोडी करताना सीसीटीव्हीत पकडले
By admin | Published: February 2, 2016 06:28 PM2016-02-02T18:28:26+5:302016-02-02T18:31:22+5:30
केरळमधील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)च्या नेत्याला एका घरातून चोरी करुन बाहेर पडताना सीसीटीव्हीत पकडल्याचा व्हिडिओ पोलीसांनी रिलीज केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
थिरुवंनतपुरम, दि. २ - केरळमधील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)च्या नेत्याला एका घरातून चोरी करुन बाहेर पडताना सीसीटीव्हीत पकडल्याचा व्हिडिओ पोलीसांनी रिलीज केला आहे.
राघवन असे या मार्क्सवादी नेत्याचे नाव आहे. उत्तर केरळातील कोसारगोडे जिल्ह्यात लोकप्रिय असलेल्या राघवनचा घरफोडीचा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर तो गायब झाला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस राघवनचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कुटुंबियांसह यूएईमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यावसायिक मोहम्मद युनूस यांच्या घरी आरोपी राघवनने घरफोडी केली. त्यानंतर युनूस यांच्या घरा शेजारी राहणा-यांनी यासंदर्भात माहिती युनूस यांना दिली. युनूस यांनी आपल्या नातेवाईकांना सांगून पोलिसांना कऴवण्यास सांगितले.
पोलिसांनी सोसायटीमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली.त्यात राघवन घराजवळून लोखंडी गज आणि बॅग घेऊन जाताना दिसून येत आहे. त्याने पांढरा पायजमा आणि शर्ट परिधान केल्याचे या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसून येत आहे.
दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून राघवनचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.