मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मराठी कामगारांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 05:32 AM2020-07-17T05:32:14+5:302020-07-17T06:46:56+5:30

रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या, तसेच निवारा गमावलेल्या १८६ महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली.

Masala king Dr. Dhananjay Datar Consolation to Marathi workers with the help | मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मराठी कामगारांना दिलासा

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मराठी कामगारांना दिलासा

Next

मुंबई : कोविड-१९ साथ व लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या गरीब मराठी कामगारांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला. रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या, तसेच निवारा गमावलेल्या १८६ महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली. या प्रवासाचा सर्व खर्च डॉ. दातार यांच्या अल अदिल ट्रेडिंग कंपनीने केला आहे. अडचणीत सापडलेल्या गरजू देशबांधवांना स्वखर्चाने मायदेशी पाठविण्याचा निर्धार डॉ. दातार यांनी केला आहे.

यासंदर्भात डॉ. दातार म्हणाले, दुबईतील लॉकडाऊन संपल्यावर अमिरातीतून भारतापर्यंत विमान वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, दुबई ते मुंबईदरम्यानची उड्डाणे अलीकडेच सुरू झाली. महाराष्ट्रातून रोजगार, शिक्षण, पर्यटन यासाठी गेलेले जवळपास ६५ हजार लोक दुबईत अडकून पडले आहेत. आमच्या अल अदिल कंपनीने गरजू भारतीयांना स्वखर्चाने मायदेशी पोहोचविण्याची मोहीम हाती घेतली. याआधी लॉकडाऊनच्या काळात आम्ही हजारो कुटुंबांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे व जंतुनाशकांचे संच मोफत पुरवले होते. निर्धन कामगारांचा विमान तिकिटाचा, तसेच वैद्यकीय चाचणीचा खर्च उचलण्याचे ठरवले.

केरळ, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील ३,००० हून अधिक गरजू बांधवांना आम्ही भारतात घरी पोहोचण्यासाठी मदत केली. त्यासाठी ३ कोटी रुपयांहून अधिक खर्च आला. अल अदिल कंपनीच्या वतीने संचालक वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार यांनी आणि प्रवाशांच्या प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या धनश्री पाटील यांनी समन्वयाचे, प्रवासी निवडीचे काम केले. परवानेविषयक औपचारिकता पूर्ण करण्यात राहुल तीळपुळे व अकबरअली ट्रॅव्हल्सचे सुलेमान यांची मदत झाली. ज्या गरजूंना अर्थसाह्याची गरज आहे त्यांनी स्वत: किंवा भारतातील नातलगांमार्फत आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दातार यांनी केले.

Web Title: Masala king Dr. Dhananjay Datar Consolation to Marathi workers with the help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.