IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 09:35 PM2020-09-03T21:35:35+5:302020-09-03T21:50:43+5:30
आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी ड्रायव्हिंग करताना किंवा सायकल चालविताना मास्क घालणे सक्तीचे आहे का, या प्रश्नावर हे उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : देशभरात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. न वापरणाऱ्याना हजाराच्या आसपास दंडही आकारण्यात येत आहे. मात्र, कार चालविताना मास्क न घातल्यास वाहतूक पोलीस किंवा आरोग्य पथके दंड आकारत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. (Is wearing mask mandatory during driving)
केंद्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, एकट्याने सायकल चालविताना किंवा कार चालविताना मास्क घालण्याबाबत कोणत्याही प्रकारची गाईडलाईन जारी करण्यात आलेली नाही. मात्र, जर ,समुहाने सायकलिंग किंवा जॉगिंग करत असाल तर मास्क घालणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.
आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी ड्रायव्हिंग करताना किंवा सायकल चालविताना मास्क घालणे सक्तीचे आहे का, या प्रश्नावर हे उत्तर दिले आहे. नुकतीच मोठ्या संख्येने मास्क न घातलेल्या वाहन चालकांवर कारवाई केल्याच्या तक्रारी होऊ लागल्या होत्या. यावर भूषण यांनी भूमिका स्पष्ट केली. कार चालविताना किंवा एकट्याने सायकल चालविताना मास्क घालण्याची सक्ती बाबत केंद्राने कोणतीही गाईडलाईन दिलेली नाही, असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, व्यायामाशी संबंधीत लोकांची जागरुकता वाढली आहे. तुम्ही दोन किंवा तीन एकत्र सायकलिंग करताना पाहू शकता. या लोकांना मास्क घालावा लागणार आहे. ते दुसऱ्यांना संक्रमित करणार नाहीत किंवा दुसऱ्यापासून संक्रमित होणार नाहीत यासाठी ही काळजी घ्यावी लागणार आहे.
चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा
EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'
महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना IAS म्हणून पदोन्नती; पाहा संपूर्ण यादी
'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला