पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये भीषण धडक, अनेक वाहनांना आग, ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 08:50 IST2024-12-20T08:45:02+5:302024-12-20T08:50:33+5:30

राजस्थानमधील जयपूर येथे पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. अपघातानंतर अनेक वाहनांना आग लागली.

Massive collision between LPG and CNG trucks near petrol pump, many vehicles set on fire, 5 killed In Rajasthan | पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये भीषण धडक, अनेक वाहनांना आग, ५ जणांचा मृत्यू

पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये भीषण धडक, अनेक वाहनांना आग, ५ जणांचा मृत्यू

राजस्थानच्या जयपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जयपूरमध्ये एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांना आग लागली आहे. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या २० हून अधिक गाड्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सुरक्षेसाठी जवळचा रस्ता वळवण्यात आला आहे. 

या अपघातात १२ ते १५ जण भाजल्याने गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या अपघातात १२ ते १५ जण भाजल्याने गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भानक्रोटा परिसरातील एका खासगी शाळेजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे एसएमएस हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये जखमींना पाहण्यासाठी गेले आहेत.

या अपघाताबाबत जयपूरचे डीएम जितेंद्र सोनी म्हणाले, 'सुमारे ४० गाड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आली असून आता फक्त १-२ वाहने उरली आहेत. या घटनेत सुमारे २३-२४ जण जखमी झाले आहेत.
 

Web Title: Massive collision between LPG and CNG trucks near petrol pump, many vehicles set on fire, 5 killed In Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.