आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:46 IST2025-04-13T16:29:56+5:302025-04-13T16:46:43+5:30
आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला.

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी
आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की लोकांना तो अनेक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या ८ कामगारांचा मृत्यू झाला. अनकापल्लेचे पोलिस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी या संदर्भात माहिती देताना घटनेला दुजोरा दिला.
आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की लोकांना तो अनेक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या ८ कामगारांचा मृत्यू झाला.
अनकापल्लेचे पोलिस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी या संदर्भात माहिती देताना घटनेला दुजोरा दिला.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी अनकापल्ले जिल्ह्यातील कोटावुरुतला येथील फटाके उत्पादन युनिटमध्ये झालेल्या स्फोटात ८ कामगारांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला. घटनेची माहिती गोळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्याशी फोनवरून बोलले.
जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकार पीडितांच्या कुटुंबांना पाठिंबा देईल आणि त्यांना खंबीर राहण्याचे आवाहन केले. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. जखमी कामगारांपैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.