तामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट, ६ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:54 IST2025-01-04T14:53:43+5:302025-01-04T14:54:03+5:30

Tamil Nadu News: तामिळनाडूमध्ये आज एका फटाक्याचा कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक जखमी झाले. ही दुर्घटना तामिळनाडू जिल्ह्यातील विरुधूनगर जिल्ह्यात घडली.  

Massive explosion at firecracker factory in Tamil Nadu, 6 dead, over 30 injured | तामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट, ६ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

तामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट, ६ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

तामिळनाडूमध्ये आज एका फटाक्याचा कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक जखमी झाले. ही दुर्घटना तामिळनाडू जिल्ह्यातील विरुधूनगर जिल्ह्यात घडली.  या घटनेची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, रसायनांचं मिश्रण करत असताना हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा जोरदार होता की, त्यात कारखान्याचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाली. तसेच अनेक लोक जखमी झाले. त्यानंतर आता घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

स्फोटाबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रसायनांचं मिश्रण करत असताना हा स्फोट झाला. त्यामुळे कारखान्याचा एक भाग कोसळून गेला. दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनन विभागाच्या पथकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि मदत आणि बचावकार्य सुरू केले. स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बलांना तैनात केले आहे.

या स्फोटामुळे फटाके निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्फोटानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  

Web Title: Massive explosion at firecracker factory in Tamil Nadu, 6 dead, over 30 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.