हिमाचलमध्ये परफ्यूम फॅक्टरीला भीषण आग, १५-२० कामगार अडकले, २ जणांनी छतावरून उड्या टाकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:54 PM2024-02-02T15:54:18+5:302024-02-02T15:54:52+5:30

हिमाचल प्रदेशमध्ये एका परफ्यूम फॅक्टरीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Massive fire breaks out at perfume factory in Himachal, 15-20 workers trapped, 2 jump from roof | हिमाचलमध्ये परफ्यूम फॅक्टरीला भीषण आग, १५-२० कामगार अडकले, २ जणांनी छतावरून उड्या टाकल्या

हिमाचलमध्ये परफ्यूम फॅक्टरीला भीषण आग, १५-२० कामगार अडकले, २ जणांनी छतावरून उड्या टाकल्या

हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यात एका कॉस्मेटिक फॅक्टरीत आग लागली. येथील कारखान्यात १५-२० कामगार अडकले आहेत. आगीनंतरचे व्हिडीओ समोर आले आहेत, यामध्ये एक महिला छतावर अडकले्याची दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील औद्योगिक शहर असलेल्या बड्डीच्या झाडामाजरी येथे ही घटना घडली. येथील कॉस्मेटिक उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार अडकले आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या बड्डी आणि नालागडच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफची टीम मदत आणि बचावासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरुच राहणार; मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा झटका

आग लागल्यानंतर या घटनेचे काही व्हिडीओही समोर आले आहेत, यामध्ये लोक कारखान्याच्या बाहेर धावताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये फॅक्टरीच्या छतावर एक महिलाही दिसत आहे. धुरामध्ये ही महिला अडकली आहे. एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती १५-२० लोक कारखान्यात अडकल्याचे सांगताना दिसत आहे.

Web Title: Massive fire breaks out at perfume factory in Himachal, 15-20 workers trapped, 2 jump from roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.