गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग; 7 जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 07:10 PM2020-07-05T19:10:18+5:302020-07-05T19:11:28+5:30
मेणबत्ती फॅक्टरी बेकायदा असल्याचे सांगितले जात आहे.
गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगरमध्ये एका मेणबत्तीच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 7 जण ठार झाले. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खलबळ उडाली असून आगीची सूचना मिळताच फायर ब्रिगेड आणि एसएसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
ही मेणबत्ती फॅक्टरी बेकायदा असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून आग लागली त्यावेळी फॅक्टरीमध्ये किती लोक होते? हे देखिल अद्याप समजू शकलेले नाहीय. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
या दुर्घटनेवर योगी आदित्यनाथांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना तत्काळ जखमींना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सायंकाळपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत
शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत
WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली
पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित
कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे
मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख