चेन्नईमध्ये भीषण आग, 176 कार जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 10:10 AM2019-02-25T10:10:57+5:302019-02-25T10:32:54+5:30
चेन्नईमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना लागलेल्या आगीत 176 कार जळून खाक झाल्या आहेत.
चेन्नई - चेन्नईमध्ये रविवारी (24 फेब्रुवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना लागलेल्या आगीत 176 कार जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीच्या मालकीच्या 176 कार जळल्या आहेत. या गाड्या मोकळ्या जागेत पार्क करण्यात आल्या होत्या. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र सुक्या गवतामुळे ही आग वेगाने पसरली. अनेक कारमध्ये गॅस असल्याने त्यांचे स्फोट झाले. आग लागली त्यावेळी वेळी 250 कार पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 176 कार जळून खाक झाल्या तर इतर कारचे देखील ऩुकसान झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 176 कार जळाल्यामुळे कंपनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
Chennai: Fire breaks out at Porur ground where more than 250 cars were parked. According to fire officials, 214 cars have been gutted in the fire. The incident reportedly took place after dry grass caught fire. Police investigation underway. #TamilNadupic.twitter.com/WO5E28UuXu
— ANI (@ANI) February 24, 2019
बंगळुरु येथील हवाई दलाच्या विमानतळावर सुरू असलेल्या एरो इंडिया प्रदर्शनामध्ये याआधी शनिवारी (23 फेब्रुवारी) भीषण आग लागली होती. एअर शो साठी आलेल्या नागरिकांच्या गाड्यांसाठी उभारण्यात आलेल्या पार्किंगमधील गवताने अचानक पेट घेतल्याने आग लागली. या आगीत जवळपास 150 भस्मसात झाल्या. यामुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते. हवाई दल, अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या जवानांनीही तातडीने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.