स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांवर सामूहिक बलात्कार, पुरुष सहकाऱ्यांनाही प्रचंड मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:20 AM2018-06-23T04:20:00+5:302018-06-23T04:20:12+5:30

झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील कोचांग गावात कार्यक्रमासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण उघड झाल्याने खळबळ माजली आहे.

Massive rape of five women from NGOs and mass rapes of men | स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांवर सामूहिक बलात्कार, पुरुष सहकाऱ्यांनाही प्रचंड मारहाण

स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांवर सामूहिक बलात्कार, पुरुष सहकाऱ्यांनाही प्रचंड मारहाण

googlenewsNext

रांची : झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील कोचांग गावात कार्यक्रमासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण उघड झाल्याने खळबळ माजली आहे. मंगळवारी झालेला हा भयानक प्रकार गुरुवारी उघडकीस आला असून, आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.
या महिला पुरुष सहकाºयांसह कोचांग गावामध्ये पथनाट्य सादर करण्यासाठी गेल्या होत्या. त्या भागांतील मुली व महिलांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असून, मानवी तस्करीचा हा प्रकार असावा, असे सांगण्यात येते. यावर जनजागृती करण्यासाठी ते पथनाट्य होते.
पण गावात सरकारी योजनेचा प्रचार करण्यासाठी संमतीविना येऊ नका, असे आरोपींनी आपणास धमकावले होते, असे यातील एका महिलेने सांगितले. पथनाटय सादर करत असतानाच काही जण तिथे आले. त्यांनी पुरुषांना प्रचंड मारहाण केली, स्वत:चे मूत्र प्राशन करण्यास भाग पाडले आणि नंतर बंदुकीच्या धाक दाखवून महिलांना ते जंगलात घेऊ न गेले. त्यासाठी संस्थेचीच गाडी त्यांनी ताब्यात घेतली. काही अज्ञात व्यक्ती तिथे आल्या व बंदुकीच्या धाकावर या महिलांना एनजीओच्याच गाडीतून अज्ञात स्थळी घेऊन गेले.
त्या लोकांनी या पाचही जणींना जंगलात नेले. तिथे त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केला आणि त्याचे मोबइलद्वारे चित्रण केले. सुमारे पाच ते सहा तास हा प्रकार सुरू होता. नंतर त्या पाचही जणींना सोडून देण्यात आले. या महिलांनी एका स्थानिक समाजसेवकाच्या कानावर हा प्रकार घातला. त्याने लगेच पोलिसांना ही माहिती दिली. (वृत्तसंस्था)
>अद्याप अटक नाही
ंआरोपींची संख्या पाच ते सहा आहे. पोलिसांना त्यांची ओळख पटली आहे. ते गावाच्या आसपास राहणारेच आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्यापैकी एकालाही आतापर्यंत अटक झालेली नाही.
आरोपींच्या शोधासाठी तीन पथके ठिकठिकाणी पाठवण्यात आली आहेत, असे रांचीचे पोलीस उममहानिरीक्षक अमोल व्ही होमकर यांनी सांगितले.

Web Title: Massive rape of five women from NGOs and mass rapes of men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.