मल्ल्यांच्या व्हिंटेज कार खरेदीला प्रचंड प्रतिसाद
By admin | Published: August 30, 2016 04:16 AM2016-08-30T04:16:13+5:302016-08-30T04:16:13+5:30
मद्य उद्योजक विजय मल्ल्या यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी बँकांच्या मंडळाला बराच संघर्ष करावा लागत असताना मल्ल्या यांच्याकडील खास कार्सचा (व्हिंटेज कार्स) ताफा लिलावात
मुंबई : मद्य उद्योजक विजय मल्ल्या यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी बँकांच्या मंडळाला बराच संघर्ष करावा लागत असताना मल्ल्या यांच्याकडील खास कार्सचा (व्हिंटेज कार्स) ताफा लिलावात विकत घेण्यासाठी मात्र अगदी सगळ््यांची धडपड झालेली बघायला मिळाली.
मल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सकडील (ही कंपनी आता अस्तित्वात नाही) प्रचंड मोठे थकलेले कर्ज वसुलीसाठी यापूर्वी त्यांच्या मालमत्ता विकायला काढल्या असताना बँकांच्या मंडळाला असा प्रतिसाद लाभला नव्हता.
२५ आॅगस्ट रोजी या कार्सचा लिलाव आॅनलाईन करण्यात आला. त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद लाभला की दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत लिलावाचे आयोजक क्विप्पो व्हॅल्युअर्स अँड आॅक्शनियर्स यांना तो सुरूच ठेवावा लागला. सतत बोली लागत असल्यामुळे त्याचा कालावधी दहा दहा मिनिटांनी वाढवावा लागला, असे सूत्रांनी सांगितले. या कार्स सध्या मुंबई, गोवा, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता येथे ठेवलेल्या आहेत.
देशात अशा प्रकारचा लिलाव प्रथमच झाला परंतु युनायटेड स्पिरीटसने बोली यशस्वी झाल्या तरी त्या रद्द करण्याचे हक्क राखून ठेवले आहेत. याबाबतची अंतिम घोषणा लवकरच केली जाईल.
थकीत कर्जाबद्दल मल्या यांच्यावर
सध्या न्यायालयांत खटले सुरू आहेत. त्यांचे व्हिंटेज व क्लासिक कार्सचे प्रेम सर्वज्ञात आहे. त्यांच्याकडे १०० अशा कार्स असल्याचे वृत्त होते. परंतु त्यांच्या नावावर त्या कागदोपत्रीहीआहेत का हे स्पष्ट नाही.