भीषण! दगड पडला अन् 3 सेकंदात कारचा चक्काचूर; दोघांचा मृत्यू, 3 जखमी, थरकाप उडवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 11:29 AM2023-07-05T11:29:02+5:302023-07-05T11:35:09+5:30

नागालँडमध्ये भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे.

massive rock smashed car leaving 2 dead and 3 injured in Dimapur's Chumoukedima, Nagaland | भीषण! दगड पडला अन् 3 सेकंदात कारचा चक्काचूर; दोघांचा मृत्यू, 3 जखमी, थरकाप उडवणारा Video

भीषण! दगड पडला अन् 3 सेकंदात कारचा चक्काचूर; दोघांचा मृत्यू, 3 जखमी, थरकाप उडवणारा Video

googlenewsNext

पावसामुळे नागालँडमध्ये भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. भूस्खलनादरम्यान राष्ट्रीय महामार्ग 29 वर काही मोठे दगड पडले, यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग 29 वरील भयावह व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे

राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या काही वाहनांवर दगड पडल्याने काही क्षणातच कारचा चक्काचूर झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय कारमध्ये एक व्यक्ती अडकला होता. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू होते. कारच्या आत बसवलेल्या डॅश कॅममध्ये हा धक्कादायक प्रकार रेकॉर्ड झाला आहे. महामार्गावर काही वाहनं उभी असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तसेच वरून अचानक मोठे दगड पडतात. 

एक दगड एवढा मोठा होता की तो कारवर पडल्यानंतर कारचा चक्काचूर झाला, तर दुसरी कार त्या दगडाला आदळल्याने उलटली. दुसऱ्या दगडामुळे पुढे उभ्या असलेल्या वाहनाचं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिमापूर-कोहिमा राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पाच वाजता दगड पडले. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याला 'पाकला पहाड' म्हणतात. येथे अनेकदा भूस्खलनच्या घटना घडतात.

नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी सांगितले की, राज्य सरकार सर्व आवश्यक पावलं उचलत आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर जखमींवर शक्य ते सर्व उपचार केले जात आहेत. देशाच्या बहुतांश भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलनाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगसारख्या डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: massive rock smashed car leaving 2 dead and 3 injured in Dimapur's Chumoukedima, Nagaland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.