मास्टर ब्लास्टर सचिनशी नो पंगा.....
By Admin | Published: March 10, 2016 11:29 PM2016-03-10T23:29:11+5:302016-03-10T23:43:44+5:30
आज पर्यंत सचिन बद्दल कोणी वाईट बोललं अथवा त्याच्यावर कोणी टीका केली किंवा त्याला डिवचले तर त्यांची कारर्किद संपल्याचा अथवा धोक्यात आल्याचा इतिहास आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - आज पर्यंत सचिन बद्दल कोणी वाईट बोललं अथवा त्याच्यावर कोणी टीका केली किंवा त्याला डिवचले तर त्याची कारर्किद संपल्याचा इतिहास आहे. काल मारिया डोंपिग चाचणीत दोषी आढल्यानंतर पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे. भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या सचिन तेंडूलकर बाबत सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु होण्याच कारण आहे मारिया शारापोव्हा. मध्यतंरी माध्यामांनी मारीयाला सचिन बद्दल विचारणा केली असता कोण आहे सचिन मी ओळखत नाही अशी तिने प्रतिक्रिया दिली होती. काल मारिया डोंपिग चाचणीत दोषी ठरला आणि तिच्यावर कारवाई करावी आसा सुर सुरु झाला.
सचिन तेंडुलकर म्हणजे करोडो क्रिकेट रसिकांसाठी देव. क्रिकेटच्या जगतामधली सगळीच रेकॉर्ड सचिननं बनवली आहेत. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये तशी सचिनवर फारशी टीका कोणी केली नाही. पण ज्यांनी सचिनवर टीका केली किंवा त्याला डिवचलं त्यांची कारकिर्द धोक्यात आल्याचा मेसेज सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये पाकिस्तानचा ऑफ स्पिनर सईद अजमल, ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर शेन टॅट, इंग्लंडचा केव्हिन पिटरसन आणि टेनिसपटू मारिया शारापोआचा दाखला देण्यात आला आहे.
माझ्यामुळेच सचिननं निवृत्ती घेतली असा दावा केलेल्या सईद अजमलवर बॉलिंग ऍक्शनमुळे आयसीसीनं बंदी घातली. २०११ वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये सचिनची विकेट घेतल्यानंतर शेन टॅटनं सचिनला चिडवलं, त्यानंतर टॅट एकही वनडे खेळला नाही. ५ वर्षांनंतर त्यानं टी-२० मध्ये भारताविरुद्ध कमबॅक केलं, पण त्या मॅचमध्येही भारतीय बॅट्समननी त्याला चांगलाच चोपला, आणि पुन्हा त्याला टीमबाहेर जावं लागलं.
इंग्लंडचा बॅट्समन ऍलिस्टर कूक हा सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला बॅट्समन आहे, असं वक्तव्य केलं होतं केव्हिन पिटरसननं. पण आता मात्र केव्हिन पिटरसन इंग्लंडच्या टीममध्ये कमबॅक करण्यासाठी धडपड करत आहे. इंग्लंडकडून पिटरसनचं खेळणं आता जवळपास अशक्य असल्याचं बोललं जात आहे.
आता सचिनची नवा बळी ठरली आहे मारिया शारापोआ. टेनिसपटू मारिया शारापोआनं आपल्याला सचिनबाबत माहिती नाही, असं वक्तव्य केलं होतं. पण ऑस्ट्रेलियन ओपनवेळी डोप टेस्टमध्ये शारापोआ दोषी आढळली आहे. त्यामुळे तिची कारकिर्दही आता धोक्यात आली आहे.
हा जरी योगायोग असला तरी खरेच आहे. त्यामुळे आज सोशल माध्यात पुन्हा हा विषय चघळला जात आहे.
#Who is Maria Sharapova
— Aravind (@aravindan_2090) July 3, 2014
He is Sachin Tendulkar.. pic.twitter.com/TeFMEgo9DN
"@SirJadeja: #Who is Maria Sharapova? This is Sachin Tendulkar who respects his game. Learn from him. pic.twitter.com/dCqKSOTIR0"
— Roxon (@roxonjoseph) July 4, 2014
#Who is Sachin Tendulkar ??#MariaSharapova@MariaSharapova