मास्टरमाईंड बापानेच बनविले मुलाला दहशतवादी; उसैदूर रेहमान होता ‘आयएसआय’च्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:42 AM2021-09-17T05:42:54+5:302021-09-17T05:43:34+5:30

दिल्ली पाेलिसांची धक्कादायक माहिती

mastermind father made a child terrorist pdc | मास्टरमाईंड बापानेच बनविले मुलाला दहशतवादी; उसैदूर रेहमान होता ‘आयएसआय’च्या संपर्कात

मास्टरमाईंड बापानेच बनविले मुलाला दहशतवादी; उसैदूर रेहमान होता ‘आयएसआय’च्या संपर्कात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :दिल्ली पाेलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचा बाप या टेरर माॅड्युलचा मास्टरमाईंड असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. त्यानेच पोराला दहशतवादी बनविले. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’साेबत त्याचा थेट संपर्क असल्याचे दिल्ली पाेलिसांनी सांगितले. 

सहा दहशतवाद्यांपैकी माेहम्मद ओसामा आणि झीशान या दाेघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले हाेते. याप्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती मिळाली. ओसामा याचा पिता उसैदूर रेहमान हा खरा मास्टरमाईंड आहे. त्यानेही पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले आहे. ताे सध्या दुबईमध्ये राहताे. तेथे ताे एक मदरसा चालवताे आणि थेट आयएसआयच्या संपर्कात आहे. कर्नल गाझी नावाच्या ‘आयएसआय’च्या एका व्यक्तीच्या संपर्कात हाेता. रेहमान याचे काही चॅट एटीएसला सापडले आहेत. त्यावरूनच या निष्कर्षावर एटीएसचे अधिकारी पाेहाेचले आहेत.

पाकमध्ये प्रशिक्षण

- ओसामा आणि झीशान यांना पाकिस्तानातील थट्टा येथील दहशतवादी शिबिरात प्रशिक्षण दिले हाेते. दाेघांनाही आत्मघाती हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले हाेते. 

- याच ठिकाणी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील दाेषी कसाबनेही  प्रशिक्षण घेतले हाेते. १५ दिवसाच्या प्रशिक्षणात त्यांना बाॅम्ब बनविणे, एके-४७ रायफल चालविणे आदी गाेष्टी शिकविण्यात आल्या हाेत्या.

जानवर मुंबईतल्या घातपाताची जबाबदारी? 

धारावीतील जान मोहम्मद शेखकडे मुंबईतील घातपाताची जबाबदारी सोपविण्यात येणार होती, अशी माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांकडून समजते. जानच्या चौकशीसाठी राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहे. 
 

Web Title: mastermind father made a child terrorist pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.