फिंगर प्रिंट स्कॅनरवर बोटांचे ठसे जुळवल्यास "या" विद्यापीठात मिळणार प्रवेश
By Admin | Published: April 19, 2017 02:12 PM2017-04-19T14:12:19+5:302017-04-19T14:12:19+5:30
राजधानीतल्या उस्मानिया विद्यापीठानं 26 एप्रिलला होणा-या शताब्दी कार्यक्रमानिमित्त नवं फर्मान काढलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - राजधानीतल्या उस्मानिया विद्यापीठानं 26 एप्रिलला होणा-या शताब्दी कार्यक्रमानिमित्त नवं फर्मान काढलं आहे. विद्यापीठाच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं तर केलं आहेच. मात्र त्यासोबत तुम्हाला आणखी एक काम करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला बारकोडवाला एंट्री पास मिळाला तरी तुम्हाला या कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळणार नाही.
प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला बोटांचे ठसे आधार कार्डच्या बायोमेट्रिक डेटाशी जुळवावे लागणार आहेत. रिपोर्टनुसार काही विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी विद्यापीठाच्या या प्रकाराला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फिंगर प्रिंट स्कॅनर लावण्याचाही विचार केला आहे. ज्यामुळे फक्त योग्य व्यक्ती कार्यक्रमात प्रवेश करू शकणार आहे. बोटांचे ठसे घेण्यापासून फक्त व्हीआयपी अधिका-यांना सूट देण्यात येणार आहे. इतर सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला या कार्यक्रमात प्रवेश करण्यासाठी बोटांचे ठसे आधार कार्डच्या बायोमेट्रिक डेटाशी जुळवावे लागणार आहेत. सुरक्षेवर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सांगितलं की, ब-याचदा गोंधळ घालण्यासाठी काही जण दुस-याचा एंट्री पास घेऊन कार्यक्रमस्थळी दाखल होतात आणि त्यानंतर धुमाकूळ घालतात.
फिंगर प्रिंट स्कॅनरच्या माध्यमातून अशा समाजकंटकांवर पोलीस अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून कार्यक्रमस्थळी फक्त योग्य व्यक्तीच जाऊ शकतील. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील प्रत्येक गेटवर एक पोलीस कर्मचारी फिंगर प्रिंट स्कॅनर मशिन घेऊन उभा राहणार आहे. मात्र व्हीआयपी गेट त्याला अपवाद असेल. फिंगर प्रिंट स्कॅनर मशिनच्या माध्यमातून आधार डेटाबेसची माहिती जुळवण्यात आल्यावरच त्या व्यक्तीला विद्यापीठात प्रवेश मिळणार आहे.