जुळ्यांचे गाव
By Admin | Published: January 4, 2017 02:28 AM2017-01-04T02:28:44+5:302017-01-04T02:28:44+5:30
केरळातील मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही एक छोटेसे गाव. देश विदेशातील संशोधकांची येथे नेहमीच ये - जा असते. त्याला कारणही तसेच आहे. येथे एक, दोन नव्हे तब्बल पाचशे जुळे
मलप्पुरम : केरळातील मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही एक छोटेसे गाव. देश विदेशातील संशोधकांची येथे नेहमीच ये - जा असते. त्याला कारणही तसेच आहे. येथे एक, दोन नव्हे तब्बल पाचशे जुळे आहेत. जुळ्यांचे गाव म्हणून याची ख्याती आता सर्वदूर पसरली आहे. जगभरातील मीडिया आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांसाठी हा औत्सुक्याचा विषय आहे. पालकांच्या परवानगीविना जुळ्या मुलांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. याची गंभीर दखल घेत ग्रामसभेने एक बैठक घेतली आणि याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली. जुळ्यांचे पालक या समितीचे सदस्य असतील. विदेशी नागरिक येथे येऊन चित्रिकरण करतात. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि विदेशी नागरिकात नेहमीच खटके उडतात. वीस हजार लोकसंख्येच्या या गावात पाचशे जुळे आहेत. ७० वर्षांपूर्वी येथे जुळ्यांचा जन्म होण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. सुुरुवातीला गावात एखादे जुळे व्हायचे. पण, नंतरच्या काळात ही संख्या वाढत गेली. येथे जेवढे जुळे मुले आहेत त्यापैकी अर्ध्या जुळ्यांचा जन्म गत दहा वर्षात झाला आहे. यावरून कल्पना करता येऊ शकते की, या गावात जुळ्यांच्या जन्माचे प्रमाण किती वाढत आहे.