भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाली लेक; वडिलांनी ऑर्डर केली तब्बल 10 लाखांची मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 16:41 IST2023-09-06T16:31:48+5:302023-09-06T16:41:02+5:30
जन्माष्टमीच्या दिवशी देवाची पूजा आणि अभिषेक सोबतच गरिबांना अन्नदान करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो - news18 hindi
कर्नाटकातील बंगळुरू येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने राधा-कृष्णाची मूर्ती बनवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. रघू बंगळुरू येथे संचालक म्हणून काम करतात आणि त्याची भगवान श्रीकृष्णावर नितांत श्रद्धा आहे. त्यांनी सांगितले की काही काळापूर्वीपर्यंत त्यांचा देवावर विश्वास नव्हता, परंतु जेव्हा त्यांची मुलगी वसतिगृहात राहू लागली तेव्हा त्यांना तेथे असे लोक आढळले जे रोज भजन ऐकत आणि गीता पाठ करतात, त्यामुळे त्यांच्या मुलीचा देवावरील विश्वास वाढू लागला.
घरीही य़ाचा परिणाम दिसून आला आणि त्यामुळे रघू देखील कृष्णाचे भक्त बनले आणि इस्कॉनमध्ये सामील होऊ लागले. त्यांनी पुढे सांगितलं की, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी भव्य स्वरूपात प्रकट व्हावेत, ही त्यांच्या मुलीची इच्छा होती आणि त्यांच्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वृंदावन येथून साडेआठ फूट उंच आणि 500 किलोपेक्षा जास्त वजनाच्या राधा आणि कृष्णाच्या मूर्ती आणल्या.
लवकरच आपल्या शहरात आश्रम आणि मंदिर बांधण्याचा त्यांचा विचार असून जन्माष्टमीच्या दिवशी देवाची पूजा आणि अभिषेक सोबतच गरिबांना अन्नदान करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. ही मूर्ती बनवणाऱ्या वृंदावन येथील अजयने सांगितले की, ही मूर्ती बनवण्यासाठी तब्बल सहा महिने लागले.
रघू यांनी सोशल मीडियावरून त्याच्याशी संपर्क साधला. ब्रजमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी मूर्ती बनवण्यात आली आहे, ती ट्रकमध्ये चढवण्यासाठीही क्रेनची मदत घ्यावी लागली, त्यात प्रामुख्याने पितळ आणि तांब्याचा वापर करण्यात आला. राधाकृष्णाच्या मूर्तीची किंमत 10 लाखांपेक्षा जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.