मथुरा-शाही ईदगाह केस : जिल्हा न्यायालयाकडून श्रीकृष्ण विराजमानची याचिका मंजूर, 1 जुलैला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:11 PM2022-05-19T14:11:05+5:302022-05-19T14:13:12+5:30
फिर्यादी पक्षाचे वकील गोपाल खंडेलवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की सप्टेंबर 2020 मध्ये सिव्हिल कोर्टाने ही केस 'राइट इश्यू' नाही असे म्हणत फेटाळली होती.
मथुरेच्या जिल्हा न्यायालयाने गुरुवारी एक महत्वपूर्ण निर्मय घेत, श्रीकृष्ण विराजमानची याचिका स्वीकारली आहे. पुनरविचार म्हणून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर गेल्या दीड वर्षांपासून सुनावणी सुरू होती. आज जिल्हा न्यायालयाने ही याचिका स्वीकारली. यासंदर्भात एक जुलैला पुढील सुनावणी होईल. महत्वाचे म्हणजे न्यायालयाच्या या निर्णयावर सर्वांचेच लक्ष होते.
फिर्यादी पक्षाचे वकील गोपाल खंडेलवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की सप्टेंबर 2020 मध्ये सिव्हिल कोर्टाने ही केस 'राइट इश्यू' नाही असे म्हणत फेटाळली होती. म्हणजेच, या प्रकरणात कुणालाही वाद करण्याचा अधिकार नाही. यानंतर हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले. आज जिल्हा न्यायालयाने फिर्यादी पक्षाची पुनरविचार याचिका स्वीकारली आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी 1 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
याचिकेत करण्यात आली आहे अशी मागणी -
या याचिकेत 2.37 एकर जमीन मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीकृष्ण विराजमानच्या एकून 13.37 एकर जमीनीपैकी जवळपास 11 एकर जमिनीवर श्रीकृष्ण जन्मस्थान आहे. तर शाही ईदगाह मशीद 2.37 एकर जागेवर आहे. हीच 2.37 एकर जमीन मुक्त करून, ती श्रीकृष्ण जन्मस्थानात सामील करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणज, यासंदर्भात, संस्थानला कुठल्याही प्रकारची तडजोड करण्याचा अधिकार नाही. ही जमीन ठाकुर विराजमान केशव कटरा मंदिराच्या नावार आहे, असे फर्यादी पक्षाचे म्हणणे आहे.