उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटामुळे इमारत कोसळली; 12 जणांचा मृत्यू, 15 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 09:15 AM2019-10-14T09:15:56+5:302019-10-14T11:27:53+5:30
उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे
मऊ - उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मऊमधील एका इमारतीतील घरात सोमवारी (14 ऑक्टोबर) सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे इमारत कोसळली. यामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
#UPDATE Death toll in Mau cylinder blast case rises to 12 https://t.co/dtLp9w8YuK
— ANI UP (@ANINewsUP) October 14, 2019
7 dead and 15 injured after a two-storey building collapsed following a cylinder blast at a home in Mohammadabad, Mau. Several feared trapped. More details awaited. pic.twitter.com/cFr7Q0pEr4
— ANI UP (@ANINewsUP) October 14, 2019