SP-BSP यांच्यात आघाडी?; मायावती, अखिलेश उद्या घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 01:25 PM2019-01-11T13:25:57+5:302019-01-11T13:27:58+5:30
बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव उद्या (दि.11) लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.
लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव उद्या (दि.11) लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुक बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी एकत्र लढण्याचे संकेत असून याबाबतची घोषणा उद्या या दोघांकडून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचा समावेश नाही आहे. त्यावरुन स्पष्ट समजते की आगामी लोकसभा निवडणुकत काँग्रेसला सोबत घेण्यास बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी इच्छुक नाहीत. दरम्यान, उद्या बारा वाजता होणाऱ्या मायावती आणि अखिलेश यादव यांच्या पत्रकार परिषदेत काय निर्णय घेण्यात येणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागा वाटपासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्ष 37-37 अशा जागा लढवतील. यामध्ये अमेठी आणि रायबरेली या जागांवर दोन्ही पक्ष आपला उमेदवार उतरवणार नसल्याचे समजते. कारण, अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघातून जागांवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, याआधी राम मंदिर आंदोलनादरम्यान 1993 मध्ये बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाचा पराभव करत उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन केली होती.