"मी PM किंवा यूपीचे CM होण्याचे स्वप्न पाहू शकते, पण राष्ट्रपती होण्याचे नाही", मायावतींचे अखिलेश यादवांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 02:45 PM2022-04-28T14:45:14+5:302022-04-28T14:46:22+5:30

Mayawati : पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री किंवा पुढील पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकते, परंतु राष्ट्रपती होण्याचे स्वप्न कधीच पाहणार नाही, असे म्हणत मायावती यांनी अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले आहे.

mayawati hit back on akhilesh yadav said not president i can dream of becoming pm in future | "मी PM किंवा यूपीचे CM होण्याचे स्वप्न पाहू शकते, पण राष्ट्रपती होण्याचे नाही", मायावतींचे अखिलेश यादवांना प्रत्युत्तर

"मी PM किंवा यूपीचे CM होण्याचे स्वप्न पाहू शकते, पण राष्ट्रपती होण्याचे नाही", मायावतींचे अखिलेश यादवांना प्रत्युत्तर

Next

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री किंवा पुढील पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकते, परंतु राष्ट्रपती होण्याचे स्वप्न कधीच पाहणार नाही, असे म्हणत मायावती यांनी अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

मायावती म्हणाल्या, "मी पुन्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकते. राष्ट्रपती होण्याचे स्वप्न मी कधीच पाहणार नाही. यूपीमध्ये भाजपच्या विजयासाठी समाजवादी पक्ष (SP) जबाबदार आहे. मला राष्ट्रपती बनवून समाजवादी पक्षाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. त्यामुळे त्यांचा यूपीच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होईल, पण मी ही जागा कधीही सोडणार नाही. बसपा आपल्या प्रभावाखाली येणार नाही, हे आता समाजवादी पक्षाच्या प्रमुखांना कळून चुकले आहे."

याचबरोबर, "मुस्लिम, दलितांच्या मतांमध्ये खूप ताकद आहे. जर हे लोक एकत्र आले तर ते मला मुख्यमंत्री बनवू शकतात. राज्यातील मुस्लिम समाजवादी पक्षावर प्रचंड नाराज आहेत. अशा परिस्थितीत ते समाजवादी पक्षासोबत जाणार नाहीत. यूपीतील मुस्लिम आणि यादवांनीही आपली मते देऊन पाहिले आहेत. अनेक पक्षांशी युती करूनही समाजवादी पक्षाला सरकार बनवता आले नाही, त्यामुळे आता पुन्हा हेच लोक बसपाचे सरकार बनवतील", असेही मायावती यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मायावती यांच्यावर टीका केली होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपाने आपले मत भाजपला दिले होते, आता भाजप मायावतींना राष्ट्रपती बनवते की नाही हे पाहायचे आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते. अखिलेश यादव यांच्या या टीकेला मायावतींनी आज प्रत्युत्तर दिले.

Web Title: mayawati hit back on akhilesh yadav said not president i can dream of becoming pm in future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.