सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता मायावतींची उडी; ठाकरे सरकारला गंभीरतेचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 01:36 PM2020-07-30T13:36:02+5:302020-07-30T13:36:11+5:30
सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर (FIR Against rhea chakraborty) गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. यानंतर बुधवारी बिहारमधून चार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं होते. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. यानंतर आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती या संपूर्ण प्रकरणाची सीबाआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मायावती ट्विट करत म्हणाल्या की, मूळचा बिहारचा तरुण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनंतर या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलंय. आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र किंवा बिहार पोलिसांकडून होण्याऐवजी सीबाआयद्वारे होणं योग्य आहे' असं मायावतींनी सांगितले आहे.
तसेच सुशांत राजपूत प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहारच्या काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे असं दिसतंय की त्यांचा खरा हेतून या प्रकरणाच्या आडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा आहे, अशी टीका देखील मायवती यांनी काँग्रेसवर केली आहे. त्याचप्रमाणे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने गंभीरता दाखवावी, असं देखील मायवती यांनी सांगितले आहे.
2. साथ ही, सुशान्त राजपूत प्रकरण में महाराष्ट्र व बिहार के काग्रेंसी नेताओं के अलग-अलग रवैये से ऐसे लगता है कि इनका असल मकसद इस प्रकारण की आड़ में पहले अपने राजनीतिक स्वार्थ की पूर्ति करना है तथा पीड़ित परिवार को न्याय दिलाना बाद में, जो कतई उचित नहीं। महाराष्ट्र सरकार गंभीर हो।
— Mayawati (@Mayawati) July 30, 2020
तत्पूर्वी, गोरेगाव येथील अंकिताच्या राहत्या घरी बिहार पोलिसांनी भेट देत तिचा जबाब नोंदवला. यावेळी सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितलं, असं अंकिताने बिहार पोलिसांना सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं, अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली. त्यामुळे आता अंकिताच्या या जबाबानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "या कटात रिया आणि तिच्या कुटुंबातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसंच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचं सागंत त्याला ते सोडायला लावलं, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे.