राज्यसभेत रोहित वेमुल्ला आत्महत्याप्रकरणी मायावती - स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक
By admin | Published: February 24, 2016 06:23 PM2016-02-24T18:23:36+5:302016-02-24T18:23:36+5:30
हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुल्ला आत्महत्याप्रकरणी चौकशी समिती नेमताना त्यात दलित सदस्याला स्थान देण्याची मागणी करत बसपाच्या अध्यक्षा मायावती आक्रमक झाल्या
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुल्ला आत्महत्याप्रकरणी चौकशी समिती नेमताना त्यात दलित सदस्याला स्थान देण्याची मागणी करत बसपाच्या अध्यक्षा मायावती आक्रमक झाल्या. त्यावर बोलताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी बसपा दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं राजकारण करत असल्याच आरोप केला. यामुळं संतापलेल्या मायावतींनी इराणी यांना मंत्रिपदावरुन दूर करण्याची मागणी करत गोंधळ सुरु केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. याचवेळी बसपा खासदारही वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करु लागले. या सगळ्या राड्याला वैतागून सभापती कुरियन यांनी बसपा खासदारांना निलंबित करण्याची धमकी दिली..
मात्र त्यानंतरही घोषणा न थांबल्यानं अखेर कामकाज स्थगित करण्यात आलं.