"जाहीर सभांमध्ये जनतेचा पैसा पाण्यासारखा वाहतोय," मायावतींचा विरोधी पक्षांवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 02:27 PM2022-01-01T14:27:06+5:302022-01-01T14:28:19+5:30

उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत.

mayawati targeted opposition parties public money is being spent in rallies up elections | "जाहीर सभांमध्ये जनतेचा पैसा पाण्यासारखा वाहतोय," मायावतींचा विरोधी पक्षांवर निशाणा 

"जाहीर सभांमध्ये जनतेचा पैसा पाण्यासारखा वाहतोय," मायावतींचा विरोधी पक्षांवर निशाणा 

Next

उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या (Uttar Pradesh Election) पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत. परंतु चार वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या आणि बसपाच्या सुप्रिमो मायावती (Former CM Mayawati) मात्र सध्या मैदानात उतरलेल्या दिसत नाहीत. मायावरती इतर नेत्यांप्रमाणे अद्यापही रॅली का करत नाहीत, असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, मायावती यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना भाजपवर निशाणा साझला आहे. तसंच त्यांच्यावर होत असलेल्या टीकांवरही त्यांनी उत्तर दिलं आहे.

"सध्या निवडणुकांपूर्वी ज्या जाहीर सभा घेतल्या जात आहे, त्या जनतेच्या पैशांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या गर्दीच्या जोरावर घेतल्या जात आहेत," असं मायावती म्हणाल्या. मायावती यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा साधला. "सत्तेतील लोकं सध्या जे काही करत आहेत ते सरकार आणि गरीबांच्या खजान्यातून करत आहेत. आमचा पक्ष गरीब जनतेचा पक्ष आहे. दुसऱ्या पक्षांप्रमाणे धनदांडग्यांच्या हा पक्ष नाही," असंही त्या म्हणाल्या.

धनदांडग्यांचा पक्ष नाही
"माझे लोक जाहीर सभा आणि रॅलींचा अधिक आर्थिक बोजा उचलू शकणार नाही. आमचा पक्ष गरीब जनतेचा पक्ष आहे. दुसऱ्या पक्षांप्रमाणे धनदांडग्यांचा हा पक्ष नाही. आमचा पक्ष एक चळवळही आहे. जर आम्ही दुसऱ्यांचं अनुकरण केलं तर पैशांच्या अभावामुळे आम्हाला निवडणुकांमध्ये मोठं नुकसानही सोसावं लागेल. निवडणुकांच्या तयारीबाबत आमची निराळी कार्यशैली आहे," असंही त्या म्हणाल्या.

'सामान्य जनतेचा पैसा'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या रॅलीदरम्यान मायावती यांच्यावर निशाणा साधला होता. "निवडणुका आल्या तरी त्या प्रचारासाठी बाहेर पडल्या नाहीत. त्या पहिल्यापासूनच पराभवाला घाबल्या आहेत, असं वाटतंय. उत्तर प्रदेशात सपा-बसपा विकास करू शकत नाहीत," असं ते म्हणाले. यावर मायावती यांनी प्रत्युत्तर दिलं.

"जेव्हा भाजप आणि काँग्रेससारख्या पक्षांचं केंद्रात किंवा ज्या राज्यांमध्ये सरकार असतं त्यावेळी निवडणुका जाहीर होण्याच्या जवळपास दोन अडीच महिन्यांपूर्वीच मोठ्या घोषणा, उद्घाटनं, लोकार्पण असे कार्यक्रम करतात. याच्याच आडून सरकारी खर्चानं मोठ्या जाहीर सभाही घेतल्या जातात. यावर पक्षाचा नाही, तर सामान्य जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो," असंही ते म्हणाले.

Web Title: mayawati targeted opposition parties public money is being spent in rallies up elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.