मायावतींचा भाऊ आणि बसपाच्या खात्यात आढळली कोट्यवधीची रक्कम

By admin | Published: December 26, 2016 10:45 PM2016-12-26T22:45:25+5:302016-12-26T22:45:25+5:30

बसपाच्या प्रमुख मायावतींचा भाऊ आणि बहुजन समाज पक्षाच्या बँक खात्यांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.

Mayawati's brother and BSP's billions of billions are found in the account | मायावतींचा भाऊ आणि बसपाच्या खात्यात आढळली कोट्यवधीची रक्कम

मायावतींचा भाऊ आणि बसपाच्या खात्यात आढळली कोट्यवधीची रक्कम

Next
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 26 - बसपाच्या प्रमुख मायावतींचा भाऊ आणि बहुजन समाज पक्षाच्या बँक खात्यांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर   कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी  इडीने दिल्लीतील युनियन बँकेच्या खात्यांच्या केलेल्या चौकशीत मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या खात्यात 1.43 कोटी आणि बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचे उघड झाले. त्यामुळे  केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या मायावतींसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 
इडीने करोल बाग येथील युनियन बँकेच्या शाखेत केलेल्या नियमित तपासणीदरम्यान ही रक्कम उघडकीस आली आहे. ही रक्कम नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा करण्यात आल्याने या रकमेविषयी संशय बळावला आहे. मात्र या खात्यातील व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे. जमा झालेल्या रकमेचे स्त्रोत उघड झाल्यानंतर पुढील चौकशी होणार आहे. आनंद कुमार यांची या प्रकरणी चौकशी होणार की नाही याबाबत तपास झाल्यानंतर निर्णय होणार आहे. आनंद कुमार यांच्याविरोधात  काही व्यवहारांबाबत याआधीपासूनच चौकशी सुरू आहे.  
 

Web Title: Mayawati's brother and BSP's billions of billions are found in the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.