मोदींच्या त्या वक्तव्यावर मायावतींचे प्रत्युत्तर
By admin | Published: February 20, 2017 09:32 PM2017-02-20T21:32:00+5:302017-02-20T21:33:09+5:30
बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मोदी म्हणजे श्री. निगेटिव्ह दलित मॅन (दलितविरोधी नेते) आहेत. बसपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पंतप्रधान अस्वस्थ झाले आहेत
पुढे बोलताना त्या म्हणाल्या सर्वोच्च नेत्याबद्दल मोदी हलक्या गोष्टी बोलतात. शब्दांचा वापर करण्यात ते कुशल असले तरी जेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळते त्यावेळी ते सगळे विसरतात. आज मला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला भाग पडले.
दरम्यान, बुंदेलखंड प्रांताच्या जलाऊन मधील ओराई येथे निवडणूक प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला केलेल्या विरोधाची खिल्ली उडवून बसप हा काही आता बहुजन समाज पक्ष राहिलेला नाही तर बहेनजी संपत्ती पार्टी झाला आहे असा हल्ला केला होता.