मुख्यसभा तहकूबीवर नियंत्रण आणणार - महापौर

By admin | Published: July 2, 2015 11:47 PM2015-07-02T23:47:04+5:302015-07-02T23:47:04+5:30

पुणे : शहराच्या विकासाची ध्येय धोरणे ठरविण्यासाठी महापालिकेच्या कामकाजाचा कणा समजली जाणा-या मुख्यसभा या पुढे तहकूब होणार नाहीत. तसेच या सभांना नगरसेवकांची जास्तीत जास्त उपस्थिती रहावी यासाठी लवकरच सर्वपक्षीय पक्षनेत्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी गुरूवारी स्पष्ट केले. महापालिकेतील नगरसेवकांना मुख्यसभांचे नियमित मानधन घेतले जाते मात्र, सभा तहकूब करण्यावर भर देत कामाकाजाकडे दूर्लक्ष केली जात असल्याची बाब मानधन घेतलय; कामकाजाचे काय या वृत्ताद्वारे लोकमतने उजेडात आणली होती. त्याची दखल घेतली स्वत: महापौरांनी घेतली आहे.

Mayor to take control of the main house Tahquibi - Mayor | मुख्यसभा तहकूबीवर नियंत्रण आणणार - महापौर

मुख्यसभा तहकूबीवर नियंत्रण आणणार - महापौर

Next
णे : शहराच्या विकासाची ध्येय धोरणे ठरविण्यासाठी महापालिकेच्या कामकाजाचा कणा समजली जाणा-या मुख्यसभा या पुढे तहकूब होणार नाहीत. तसेच या सभांना नगरसेवकांची जास्तीत जास्त उपस्थिती रहावी यासाठी लवकरच सर्वपक्षीय पक्षनेत्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी गुरूवारी स्पष्ट केले. महापालिकेतील नगरसेवकांना मुख्यसभांचे नियमित मानधन घेतले जाते मात्र, सभा तहकूब करण्यावर भर देत कामाकाजाकडे दूर्लक्ष केली जात असल्याची बाब मानधन घेतलय; कामकाजाचे काय या वृत्ताद्वारे लोकमतने उजेडात आणली होती. त्याची दखल घेतली स्वत: महापौरांनी घेतली आहे.
महापालिकेच्या गेल्या वर्षभरात झालेल्या 116 सभांमधील 98 सभा तहकूब करण्यात आल्याची बाब महापालिकेच्या वार्षिक वृंतातामधून समोर आली आहे. प्रत्यक्षात दर महिन्याची एक अशा बारा आणि 6 खाससभा अशा 18 सभा होणे अपेक्षीत असताना, वारंवार या सभा तहकूब झाल्याने त्यांची संख्या जवळपास 116 वर पोहचली आहे. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. याबाबत धनकवडे यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रत्येक महिन्याची पहिलीसभा श्रध्दांजली, एखादी मोठी घटना, दूर्घटना घडल्यास तहकूब केली जाते. मात्र, इतर वेळी मुख्यसभेत कामकाज होणे आवश्यक आहे. त्या शिवाय शहरातील विषयांवर चर्चा होणे अशक्य आहे. त्यामुळे या तहकूब सभांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त सभा चालविल्या जातील यासाठी सकारात्कम निर्णय घेतला जाईल. तसेच नगरसेवकांची उपस्थिती वाढविण्यासाठीही त्यांच्याशी चर्चा करून सूचना केल्या जातील असेही धनकवडे यांनी स्पष्ट केले.
===================================
30 जून दिलेल्या बातमीचे कात्रण लावणे......

Web Title: Mayor to take control of the main house Tahquibi - Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.