महापौरांची आज होणार निवड तीन उमेदवार रिंगणात : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत चुरस...

By admin | Published: May 11, 2016 10:15 PM2016-05-11T22:15:47+5:302016-05-12T00:51:56+5:30

लातूर : लातूर महानगर पालिकेच्या महापौरपदाची आज निवड होणार असून, यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडीदरम्यान होणार्‍या रजाकीय तडजोडी आणि हालचालीकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Mayor's election to be held today: Congress, Shiv Sena and NCP in Churas ... | महापौरांची आज होणार निवड तीन उमेदवार रिंगणात : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत चुरस...

महापौरांची आज होणार निवड तीन उमेदवार रिंगणात : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत चुरस...

Next

लातूर : लातूर महानगर पालिकेच्या महापौरपदाची आज निवड होणार असून, यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडीदरम्यान होणार्‍या रजाकीय तडजोडी आणि हालचालीकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात पिठासीन अधिकारी पांडुरंग पोले यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक आयोजि करण्यात आली आहे. या बैठकीत नवा महापौर निवडला जाणार आहे. महापौर पदासाठी काँग्रेसचे ॲड़ दिपक सूळ, शिवसेनेचे गोराबा गाडेकर आणि राष्ट्रवादीच्यावतीने तांबोळी अशा तीन जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ऐनवेळी कोण माघार घेणार, यावरही बरच काही अवलंबून आहे. महानगरपालिकेच्या राजकारणाची भविष्यातील राजकीय समीकरणे बदलणारी ही निवडणूक ठरणार आहे. काँग्रसे पक्षाला महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे, काँग्रेसचाच महापौर होणार हे जवळपास निि›त आहे. निवडणूक म्हणून केवळ औपचारीकताच बाकी राहिली आहे. जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे महापौरपदाची जागा रिक्त झाली आहे.
सेना, राष्ट्रवादीचेही उमेदवार...
जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द झाल्याने महापौरपदाची जागा रिक्त झाल्याने, या जागेवर शिवसेना, राष्ट्रवादीनेही महापौरपदासाठीच्या निवडणुकीसाठभ उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी आणि सेनेची सदस्य संख्या अल्प असली तरी निवडणुक लढविण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखविली आहे.
काँग्रेसकडे संख्याबळ...
लातूर महानगरपोलिकेत काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. अर्थात काँग्रेस पक्ष हाच या पालिकेतील किंगमेकरच्या भूमिकेत आहे. कोणाला महापौर करायचे आणि कोणाला नाही, ही खेळी काँग्रेसच्या पत्त्यावर अवलंबून आहे. काँग्रेसला स्पष्ट बहूमत असल्याने ॲड़ दिपक सूळ हेच महापौर म्हणून जवळपास निि›त आहेत.
तरीही चूरस...
काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ हे सर्वाधिक असतानाही, महापौरपदासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमुळे चुरस निर्माण झाली आहे. महापौर निवडीदरम्यानच्या राजकीय डावपेच आणि हालचालींकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mayor's election to be held today: Congress, Shiv Sena and NCP in Churas ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.