केजरीवालांच्या घरासमोर तीन महापौरांचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 03:11 AM2020-12-19T03:11:52+5:302020-12-19T03:12:07+5:30
राज्य सरकारकडून कथित १,३०० कोटी रुपयांची थकबाकी मिळवण्यासाठी तीनही महापौरांनी समर्थकांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले आहे
नवी दिल्ली : प्रलंबित निधीवरून तीनही मनपांमधील सत्ताधारी भाजप व आम आदमी पक्षामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. राज्य सरकारकडून कथित १,३०० कोटी रुपयांची थकबाकी मिळवण्यासाठी तीनही महापौरांनी समर्थकांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले आहे, तर महापालिकांमध्ये २,५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगून गृहमंत्री व नायब राज्यपालांच्या निवासास्थानासमोर आंदोलनाची परवानगी आप नेत्यांनी न्यायालयात मागितली आहे. आप आमदार आतिशी व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी य़ाचिका दाखल केली.
२,५०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी
भाजपची सत्ता असलेल्या दिल्लीतील महानगरपालिकांमध्ये २,५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशा मागणीचा ठराव दिल्ली विधानसभेने शुक्रवारी संमत केला.