१० कोटींचा निधी परत मिळण्याचे संकेत महापौरांचे निवेदन : मुख्यमंत्र्यांचे सचिवांना निर्देेश
By admin | Published: March 30, 2016 12:25 AM2016-03-30T00:25:47+5:302016-03-30T00:25:47+5:30
जळगाव : महसूल विभागाने शासकीय करांच्या थकबाकी पोटी परस्पर वळता केलेला मनपाचा विकास कामांचा १० कोटी ६७ लाखांचा निधी परत मिळण्याचे संकेत आहेत. महापौर नितीन ला यांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारी मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले असता त्यावर जिल्हाधिकार्यांना स्पष्ट निर्देश देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास सचिवांना दिल्या आहेत.
Next
ज गाव : महसूल विभागाने शासकीय करांच्या थकबाकी पोटी परस्पर वळता केलेला मनपाचा विकास कामांचा १० कोटी ६७ लाखांचा निधी परत मिळण्याचे संकेत आहेत. महापौर नितीन ला यांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारी मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले असता त्यावर जिल्हाधिकार्यांना स्पष्ट निर्देश देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास सचिवांना दिल्या आहेत.मनपाकडे महाराष्ट्र शिक्षण कर व रोजगार हमी करापोटी १०कोटी ७० लाख ४१ हजार ११२ रुपयांची थकबाकी मनपाकडे दर्शवित तशी नोटीस तहसीलदारांनी बजावली होती. मात्र मनपाने २०१२-१३ ते फेब्रुवारी २०१६ अखेर मनपाने वसूल केलेली रक्कम वेळोवेळी शासकीय कोषागारात भरणा केली आहे. त्यामुळे मनपाकडे जेमतेम २ कोटीची थकबाकी आहे. त्यातच जिल्हाधिकार्यांकडील ९ मार्च २०१६ रोजीच्या पत्रानुसार मनपाला मुद्रांक शुल्काची प्राप्त १ कोटी ९२ लाखांची रक्कम महाराष्ट्र शिक्षण कर व रोहयो करापोटी शासकीय कोषागार यांच्याकडे वर्ग केली असल्याचे कळविले आहे. त्यामुळे मनपाकडे केवळ १६ लाख रुपयांची थकबाकी असताना मनपाला मूलभूत सुखसुविधा पुरविण्यासाठी प्राप्त ५ कोटी व रस्ता अनुदानासाठीची ३ कोटी ७५ लाखांची अशी ८ कोटी ७५ लाखांची रक्कम तहसीलदार यांच्याकडे परस्पर वर्ग करण्यात आली आहे. ती रक्कम परत विकास कामांसाठी मनपाच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. या विषयावर आधीदेखील चर्चा झालेली असल्याने व त्याअनुषंगाने शासन आदेशही निघालेला असला तरीही त्यापूर्वी वळता केलेल्या निधीबाबत निर्देश नसल्याने मनपाची अडचण झाली असल्याचे ला यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी उपमहापौर ललित कोल्हे हेदेखील सोबत उपस्थित होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास सचिवांना याबाबत जिल्हाधिकार्यांना स्पष्ट निर्देश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मनपाचा निधी परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ------मनपाला अधिकारी देण्याची मागणीमहापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे मनपाला अधिकारी देण्याची मागणीही केली. मनपा आयुक्तांचा तसेच उपायुक्तांचा कार्यकाळ संपत आलेला असल्याने त्यांची बदली झाल्यास तातडीने तेथे अन्य अधिकारी मिळावेत. तसेच एक उपायुक्तपद ८ महिन्यांपासून रिक्त आहे. १ सहायक आयुक्त, अप्पर आयुक्त, आरोग्याधिकारी, नगररचना सहायक संचालक पदी अधिकारी देण्याची मागणी केली.-------२५ कोटींचा निधीही मिळण्याची शक्यतामुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटीचा निधी अद्याप मिळालेला नाही. त्याची फाईलही मार्गी लागली असून लवकरच हा निधी मनपाला प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.