प्रभाग २४च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर मनपा: मनसे व भाजपा देणार उमेदवार
By admin | Published: March 23, 2017 05:18 PM2017-03-23T17:18:44+5:302017-03-23T17:18:44+5:30
जळगाव: मनसेच्या मंगला चौधरी यांनी पक्षादेशाचे पालन न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याने या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्याचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. त्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान मनसेच्या नगरसेवकाची ही जागा असल्याने मनसे उमेदवार देईल, म्हणून खाविआ व राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपा मात्र उमेदवार देणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.
Next
ज गाव: मनसेच्या मंगला चौधरी यांनी पक्षादेशाचे पालन न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याने या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्याचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. त्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान मनसेच्या नगरसेवकाची ही जागा असल्याने मनसे उमेदवार देईल, म्हणून खाविआ व राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपा मात्र उमेदवार देणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.या पोटनिवडणुकीची अधिसूचना २७ रोजी प्रसिद्ध होत असून नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निित केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी २७ मार्च रोजी सकाळी ११ ते ३ एप्रिल २०१७ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदत असून आहे. छाननी ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. माघारीची मुदत ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून ८ रोजी सकाळी ११ पासून निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतीम यादी ८रोजी जाहीर होईल. तसेच १९ रोजी सकाळी ७-३० ते सायंकाळी ५.३० यावेळात मतदान होईल. मतमोजणी २१ रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येईल. तर राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची मुदत २२ एप्रिलपर्यंत आहे. आचारसंहिता प्रभागापुरतीचया पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र ही आचारसंहिता केवळ त्या प्रभागापुरतीच असल्याचे आयुक्तांनी सांगितले.