MCD Election Result : दिल्लीत भाजपाच बाहुबली
By admin | Published: April 26, 2017 08:41 AM2017-04-26T08:41:19+5:302017-04-26T18:50:01+5:30
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाने दिल्लीच्या तिन्ही महापालिकांमध्ये दणदणीत विजयाची नोंद केली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 -एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाने दिल्लीच्या तिन्ही महापालिकांमध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. 2012 च्या तुलनेत उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्लीमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला. भाजपाने सर्वाधिक 181 जागा जिंकल्या. आम आदमी पार्टी 48 जागांसह दुस-या तर, काँग्रेसला फक्त 30 जागा जिंकता आल्या.
2015 विधानसभा निवडणुकीत मिळवलेले जमसमर्थन आपला टिकवता आले नाही. आपने आपल्या पराभवासाठी ईव्हीएम मशीन्सना जबाबदार धरले आहे. ईव्हीएम मशीन्समध्ये छेडछाड झाल्यामुळे पराभव झाल्याचा दावा आपने केला. दिल्लीमध्ये पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारुन अजय माकन यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यापुढे वर्षभर कोणतेही पद न स्वीकारता सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीन असे माकन यांनी सांगितले.
दरम्यान आपच्या दिलीप पांडे यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन दिल्लीतील पक्षाच्या संयोजकपदाचा राजीनामा दिला. छत्तरपूर येथील भाजपा उमेदवार अनिता तन्वर यांनी फक्त दोन मतांनी विजय मिळवला. ईव्हीएम मशीन छेडछाडीच्या आरोपावर बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, विरोधी पक्षांनी पराभव स्वीकारला पाहिजे, जनतेने जो कौल दिलाय त्याचा अपमान करु नये.
State EC official trends: BJP-44, Congress-10, AAP-4, Independent-1 #DelhiMCDElections2017
— ANI (@ANI_news) April 26, 2017
BJP Delhi chief Manoj Tiwari offers prayers ahead of counting of votes for #DelhiMcdElection2017pic.twitter.com/KQXtvauaYq
— ANI (@ANI_news) April 26, 2017
Counting of votes for Delhi Municipal polls to begin shortly #DelhiMCDElections2017 (Visuals from outside counting centre in RK Puram Sec-3) pic.twitter.com/sZMv1UR5g5
— ANI (@ANI_news) April 26, 2017