MCD Election Result : भाजपा साजरा करणार नाही विजयोत्सव कारण...
By admin | Published: April 26, 2017 11:08 AM2017-04-26T11:08:36+5:302017-04-26T12:09:43+5:30
दिल्लीत कमळ फुलल्यानं भाजपाच्या नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र पक्षनेतृत्वानं विजयोत्सव धुमधडाक्यात साजरा न करण्याची सूचना दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - राजधानी नवी दिल्लीत झालेल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी बुधवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाचं पारडं जड असल्याचं सिद्ध झालं. दिल्लीत कमळ फुलल्यानं भाजपाच्या नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र पक्षनेतृत्वानं विजयोत्सव धुमधडाक्यात साजरा न करण्याची सूचना दिली आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती शोक व्यक्त करत भाजपा नेतृत्वाकडून ही सूचना जारी करण्यात आली आहे.
जनतेला भाजपाची धोरणं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन यांनी दिली आहे. तर दिल्लीतील भाजपाच्या उपाध्यक्ष शाजिया इल्मी यांनी दिल्ली मनपा निवडणुकीतील भाजपाच्या कामगिरीचं कौतुक करत नव्या राजकारणाचा विजय असल्याचं म्हटले आहे. काँग्रेस आणि आप दोन्ही पक्ष नकारात्मक अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, ज्यामुळे दिल्लीवासियांनीही त्यांना स्वीकारलं नाही.
तर दुसरीकडे दिल्लीतील भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्लीवासियांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर विश्वास दाखवण्यासाठी दिल्लीवासियांचे आभार मानत त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. दिल्ली मनपा निवडणुकीचे निकाल म्हणजे दिल्ली सरकारच्या कामकाजावर आलेले सार्वमत असल्याचं सांगत त्यांनी केजरीवाल यांना टार्गेट केले.
भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांनीही केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "प्रत्येक गोष्टीवर आरोप करणं, काम न करणं ही आम आदमी पार्टीच्या पराभवाची कारणं आहेत", अशी खोचक टीका शाहनवाज हुसैन यांनी केली. आम आदमी पार्टीची ही चिंतनाची वेळ आहे, असं सल्लाही त्यांनी केजरीवाल यांना दिला आहे. शिवाय, आता अरविंद केजरीवाल यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असेही हुसैन म्हणाले आहेत.
Poster put up outside BJP HQ dedicating MCD win to CRPF jawans who lost their lives in #sukmaattack#DelhiMCDElections2017pic.twitter.com/vpTePAclNM
— ANI (@ANI_news) April 26, 2017