मो. अझहरुद्दीनचे एचसीए अध्यक्षपद संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:47 AM2023-02-17T05:47:39+5:302023-02-17T05:48:14+5:30

हैदराबाद क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी बरखास्त केली आहे

Md. Azharuddin's tenure as HCA president ends | मो. अझहरुद्दीनचे एचसीए अध्यक्षपद संपुष्टात

मो. अझहरुद्दीनचे एचसीए अध्यक्षपद संपुष्टात

googlenewsNext

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील हैदराबाद क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. यामुळे अझहरुद्दीनला अध्यक्षपद गमवावे लागले. एमसीएचा कारभार पाहण्यासाठी कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. एल. नागेश्वर राव यांची कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आणि आगामी निवडणुका आयोजित करण्यासाठी नियुक्ती केली.

सप्टेंबर २०२२ पासून मोहम्मद अझहरुद्दीन यांनी निवडणूक घेण्यास टाळाटाळ चालविल्याने विद्यमान कार्यकारिणी विरोधात प्रतिस्पर्धी गटाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

Web Title: Md. Azharuddin's tenure as HCA president ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.