NEET परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्याचे हादरवणारं कृत्य; कुटुंबाचाही विश्वास बसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 04:25 PM2024-09-16T16:25:02+5:302024-09-16T16:28:48+5:30

नीट परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या एका विद्यार्थ्याने दिल्लीत आपलं आयुष्य संपवलं आहे.

MD student who was All India topper in NEET End his life in delhi | NEET परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्याचे हादरवणारं कृत्य; कुटुंबाचाही विश्वास बसेना

NEET परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्याचे हादरवणारं कृत्य; कुटुंबाचाही विश्वास बसेना

Shocking News : गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अभ्यासाच्या तणावाखाली अनेक विद्यार्थ्या आत्महत्येचा पर्याय स्विकारताना पाहायला मिळत आहे. अशातच पंजाबमधून अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. नीट परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. देशात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याने अशा प्रकारचे पाऊल उचलल्याने त्याच्या कुटुंबियांसह सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.

दिल्लीच्या आयपी इस्टेट पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील रेडिओलॉजी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. रविवारी सकाळी दिल्ली पारसी अंजुमन येथे त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. २५ वर्षीय डॉक्टर नवदीप सिंग असे मृताचे नाव आहे. तो मूळचे पंजाबमधील मुक्तसर साहिबचा होता. नवदीपच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. पोलिसांनी संध्याकाळीच शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. नवदीपच्या आत्महत्येचे कारण सध्या समजू शकलेले नसून पोलीस तपास करत आहेत.  

२०१७ च्या नीट युजी परीक्षेत नवदीप संपूर्ण देशात अव्वल ठरला होता. तो रेडिओलॉजीमध्ये पीजीचे शिक्षण घेत होता. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण मुक्तसर हादरले आहे. २०१७ मध्ये दिलेल्या नीट परीक्षेत त्याला ६९७ गुण मिळाले होते.  नवदीप सिंग नीटमध्ये अव्वल आल्यानंतर  संपूर्ण मुक्तसरमध्ये आनंदाची लाट उसळली होती. हेच त्याचे एकमेव ध्येय असल्याचे नवदीपने सांगितले होते. त्याला बारावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवदीप सिंगचे वडील गोपाल सिंग त्याला फोन करत होते. मात्र त्याने काहीच उत्तर दिलं नाही. अनेकदा फोन करूनही प्रतिसाद न आल्याने त्यांनी नवदीपच्या एका मित्राला विचारण्यास सांगितले. नवदीपच्या खोलीला आतून कडी असल्याचे मित्राने पाहिले. त्यानंतर नवदीपने बराच वेळ दरवाजा न उघडल्याने सुरक्षा रक्षकाने त्याला उठवण्यासाठी पोहोचला. सुरक्षा रक्षकाने दोन-तीन वेळा दरवाजा ठोठावला पण प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर सुरक्षा रक्षकाने इतर लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला. दरवाजा तोडला असता सर्वांनाच धक्का बसला. खोलीत नवदीपचा मृतदेह लटकलेला होता. प्राथमिक तपासानुसार, नवदीपने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खोलीत कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

नवदीपच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी त्याचे सहकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांकडे चौकशी सुरू केली ाहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला आहे. नवदीपच्या आत्महत्येची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांचा सुरुवातीला विश्वास बसला नाही. कारण नवदीप घरात आणि मित्रांसोबत नेहमी हसत-खेळत असायचा. त्याला काहीही अडचण नव्हती. त्याचे वडील गोपाल सिंग सांगतात की, त्याला क्रिकेटची आवड होती. दिल्लीतील मोठ्या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचे त्याचे स्वप्न होते.
 

Web Title: MD student who was All India topper in NEET End his life in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.