MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल सुखरूप, निधनाची बातमी चुकीची
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 12:55 PM2018-10-07T12:55:59+5:302018-10-07T13:15:15+5:30
एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबतची माहिती अफवा असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबतचे वृत्त अफवा असल्याची माहिती समोर आले आहे. महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या परिवाराकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. यामध्ये महाशय धर्मापाल यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी (6 ऑक्टोबर) रात्रीपासून सोशल मीडियावर महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाचे वृत्त पसरले होते. पण ही केवळ अफवा असल्याचे महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या परिवाराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गुलाटी यांचा व्हिडीओ जारी करत त्यांच्या निधनाच्या अफवांना पूर्णविराम देण्यात आला आहे.
(मसाल्यांचे बादशाह ‘एमडीएच’चे मालक चुन्नी लाल गुलाटी यांचे निधन)
सीमा कुमार गिल का फ़ेसबुक पोस्ट बताता है कि #MDH मसाले के सरताज धर्मपाल जी सही सलामत हैं। इस पोस्ट के साथ एक वीडियो भी है जिसके बारे में ये पोस्ट कहता है कि ‘आज सुबह मँगाया गया’ है।
— Umashankar Singh (@umashankarsingh) October 7, 2018
कृपया फ़ैक्ट चेक कर ही ख़बर को आगे बढ़ाएँ। pic.twitter.com/MphR8hUAdW
गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानातील सियालकोटमध्ये झाला होता. चुन्नी लाल गुलाटी यांचे खरे नाव महाशय धरमपाल गुलाटी होते. फाळणीनंतर चुन्नी लाल गुलाटी दिल्लीतील करोल बाग भागात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी भारतात मसाल्यांचे अनेक कारखाने सुरू केले. त्याशिवाय, दुबई आणि लंडनमध्येही ‘एमडीएच’ कंपनीचे कार्यालय आहे. सध्याच्या घडीला जवळपास 100 देशांमध्ये ‘एमडीएच’ कंपनीचा कारभार चालतो. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे. चुन्नी लाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.