MDH New Face: धरमपाल गुलाटी यांची जागा कोणी घेतली? MDH मसालेच्या जाहिरातींमध्ये दिसतोय नवा चेहरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 09:04 PM2022-07-14T21:04:05+5:302022-07-14T21:05:28+5:30

MDH Masale New Face: मसाले किंग धरमपाल गुलाटी यांच्या मृत्यूनंतर एमडीएच मसालेच्या जाहिरातींमध्ये एक नवीन चेहरा दिसत आहे.

MDH New Face: Who replaced Dharampal Gulati? A new face appears in MDH's ads | MDH New Face: धरमपाल गुलाटी यांची जागा कोणी घेतली? MDH मसालेच्या जाहिरातींमध्ये दिसतोय नवा चेहरा...

MDH New Face: धरमपाल गुलाटी यांची जागा कोणी घेतली? MDH मसालेच्या जाहिरातींमध्ये दिसतोय नवा चेहरा...

googlenewsNext

MDH New Face Revealed: MDH मसाले हे भारतातील सर्वात प्रसिद्ध मसाल्यांपैकी एक आहेत. मसाला किंग आणि एसडीएचचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले धरमपाल गुलाटी यांनी कठोर परिश्रमानंतर या कंपनीला देशातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक बनवले आहे. 1919 मध्ये त्यांचे वडील चुन्नीलाल गुलाटी यांनी महाशियां दी हत्ती म्हणजेच MDH सुरू केले. स्वातंत्र्यानंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यानंतर महाशय धरमपाल गुलाटी यांनी अवघ्या 1000 रुपयांमध्ये ही कंपनी सुरू केली. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मोठे यश संपादन केले. मात्र काही काळापासून एमडीएचच्या जाहिरातींमध्ये एक नवा चेहरा पाहायला मिळत आहे. अनेकांना उत्सुकता लागली आहे की, हा नवीन व्यक्ती कोण आहे..?

जाहिरातींमध्ये दिसणारा नवा चेहरा कोण?
MDH चे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले. यानंतर ही कंपनी विकली जाणार असल्याची अफवा उडू लागली. त्याचवेळी मसाल्यांच्या जाहिरातींमध्ये त्यांची जागा कोण घेणार, अशीही चर्चा रंगली होती. दरम्यान, एमडीएच स्पाइसेसच्या जाहिरातींमध्ये नवा चेहरा दिसू लागला. हा नवा चेहरा दुसरा कोणी नसून धरमपाल गुलाटी यांचा मुलगा आणि कंपनीचे चेअरमन राजीव गुलाटी आहेत. धरमपाल गुलाटी यांच्या निधनानंतर राजीव गुलाटी यांनीही कंपनीबाबतच्या अफवांवर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले राजीव गुलाटी
राजीव गुलाटी यांनी ट्विट करून अफवांचे खंडन केले आणि लिहिले की, 'ही बातमी पूर्णपणे खोटी, बनावट आणि निराधार आहे. MDH प्रायव्हेट लिमिटेड हा आमचा वारसा आहे, जो महाशय चुन्नीलाल आणि महाशय धरमपाल यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य खर्ची घालून उभारला आहे. तो वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कृपया अशा अफवांवर लक्ष देऊ नका, विश्वास ठेवू नका.' दरम्यान, आता राजीव आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवणार असून, कंपनीच्या पुढे येणाऱ्या जाहिरातींमध्येही ते दिसणार आहेत.

Web Title: MDH New Face: Who replaced Dharampal Gulati? A new face appears in MDH's ads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.