MDHचे दादाजी ठरले सर्वात श्रीमंत सीईओ

By Admin | Published: January 17, 2017 09:49 AM2017-01-17T09:49:40+5:302017-01-17T09:51:08+5:30

एमडीएच कंपनीचे सीईओ धरमपाल गुलाटी हे भारतातील स्रवात श्रीमंत सीईओ ठरले आहेत.

MDH's grandfather is the richest CEO | MDHचे दादाजी ठरले सर्वात श्रीमंत सीईओ

MDHचे दादाजी ठरले सर्वात श्रीमंत सीईओ

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - लाल मिरची पावडरपासून ते सांबार मसाल्यापर्यंत.. प्रत्येक स्वयंपाकघरात वर्षोनवर्षे हक्काने विराजमान झालेले MDH मसाले सर्वांच्याच परियचाचे. त्याच मसाल्याच्या पॅकेटवर सुहास्य वदनाने झळकणारे, पिळदार मिशीवाले आजोबा अर्थात धरमपाल गुलाटी हे देशातील 'सर्वात श्रीमंत सीईओ' बनले आहेत. विशेष म्हणजे ९४ वर्षांच्या या आजोबांनी या रेसमध्ये गोदरेज कन्झ्युमरचे आदि गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता तसेच आयटीसीचे वाय. सी. देवेश्वर यांना मागे टाकत प्रथम क्रमांत पटकावला आहे. महाशियां दी हट्टी ही कंपनी एमडीएच नावाने प्रसिद्ध आहे.
अवघे पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले धरमपाल गुलाटी हे महाशयजी या नावानेही ओळखले जातात. वयाच्या ९४व्या वर्षीही ते नेमाने, न चुकता दररोज कारखान्यात जातात आणि डीलर्सनाही भेटतात. त्यांच्याकडे एमडीएच कंपनीच्या समभागांपैकी ८० टक्के समभाग असून कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटींचा नफा कमावला ज्यापैकी २१ कोटी रुपये सीईओ गुलाटी यांच्या खात्यात जमा झाले. गुलाटी यांचे वडील चुन्नीलाल यांनी १९१९ साली पाकिस्तानातील सियालकोटमध्ये एक छोटंस दुकान सुरू केलं. मात्र त्याच दुकानाचे रुपांतर एवढ्या मोठ्या कंपनीत होईल, असा विचार त्यांनी स्वप्नातही केला नव्हता. मात्र धरमपाल गुलाटी यांनी ६ दशके अथक मेहनत करून ही कंपीन आज या पदावर पोहोचवली आणि मसाल्यांच्या जगात एक नव स्थान मिळवलं. विशेष म्हणजे एवढे पैसे कमावूनही गुलाटी यांचे पाय अद्यापही जमिनीवर असून आपल्या मिळकतीमधील ९० टक्के रक्कम ते दान करतात.

Web Title: MDH's grandfather is the richest CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.