#MeToo: केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ; चार महिलांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 06:16 PM2018-10-10T18:16:35+5:302018-10-10T18:19:07+5:30

काँग्रेसकडून अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी

me too campaign four womens makes serious allegations on central minister m j akbar | #MeToo: केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ; चार महिलांचे गंभीर आरोप

#MeToo: केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ; चार महिलांचे गंभीर आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली: लैंगिक शोषणामुळे अमेरिकेत सुरू झालेलं #MeToo वादळ आता भारतात पोहोचलं आहे. बॉलीवूडनंतर या वादळानं राजकारणही ढवळून काढलं आहे. याचा पहिला धक्का मोदी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेल्या एम. जे. अकबर यांना बसला आहे. अकबर यांच्यावर चार महिलांनी सनसनाटी आरोप केले आहेत. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

वरिष्ठ पत्रकार गजला वहाब यांनी एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. 1994 मध्ये 'द एशियन एज'मध्ये असताना अकबर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप गजला यांनी केला आहे. 'अकबर यांचं लिखाण मला आवडायचं. त्यामुळे मला पत्रकार व्हायचं होतं. मला त्यांच्याकडून पत्रकारिता शिकायची होती,' असं गजला यांनी म्हटलं आहे. अकबर यांच्याबद्दल मनात असलेल्या प्रतिमेला 1997 मध्ये तडा गेला. त्यांनी जवळपास 6 महिने माझ्याशी अश्लिल कृत्यं केली. विशेष म्हणजे हे सर्व त्यांच्या केबिनमध्ये घडलं, अशी व्यथा गजला यांनी मांडली आहे. 

सध्या सोशल मीडियावर #MeToo मोहिमेनं जोर धरला आहे. त्यामुळे गजला वहाब यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली. आपण अत्याचारांची वाच्यता केल्यामुळे इतरही महिला अकबर यांच्याविरोधात मोकळेपणानं बोलतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर तीन महिल्यांनी अकबर यांच्यावर गंभीर आरोप केले. यामध्ये वरिष्ठ पत्रकार प्रिया रमानी, शूमा राहा आणि लेखिका प्रेरणा सिंह बिंद्रा यांचा समावेश आहे. याविषयी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी या प्रश्नांना बगल दिली. यावरुन काँग्रेसनं अकबर यांच्यावर निशाणा साधला आहे. अकबर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी केली आहे. 
 

Web Title: me too campaign four womens makes serious allegations on central minister m j akbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.