"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 06:24 PM2024-10-17T18:24:18+5:302024-10-17T18:27:54+5:30

दोन दिवसापूर्वी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता भारताने प्रत्युत्तर दिले आहे.

MEA says Canada failed to act against Lawrence Bishnoi gang despite India's request | "कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

दोन दिवसापूर्वी कॅनडानेभारतावर गंभीर आरोप केले होते, या आरोपानंतर आता भारतानेहीकॅनडावर आरोप केले आहेत. भारताकडून प्रत्यार्पणाच्या किमान २६ विनंत्या कॅनडाकडे अजूनही प्रलंबित आहेत. यावरुन भारताने कॅनडाला सुनावले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, '२६ जणांच्या प्रत्यार्पणाची प्रकरणे गेल्या दशकापासून किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित आहेत, असा आरोप त्यांनी केला. कॅनडामधील शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येशी भारताचा संबंध जोडल्यानंतर या आठवड्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी बिघडले आहेत. 

बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी

 रणधीर जैस्वाल म्हणाले, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक करण्याची विनंती कॅनडालाही केली होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही,'लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांच्या अटकेसाठी आम्ही कॅनडाला काही विनंत्या शेअर केल्या होत्या. त्यांनी आमच्या मुख्य समस्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामागे राजकीय हेतूही आहे, असाही आरोप केला. 

कॅनडाने कोणतेही पुरावे दिले नाहीत

यावेळी भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. तसेच कॅनडाने आरोपाचे कोणतेही पुरावे दिले नसल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, चौकशीदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेले हे भारतावरील आरोप  महत्त्वाचे आहेत हे दिसून येते. याआधी बुधवारी, ट्रूडो यांनी कबूल केले की त्यांच्याकडे फक्त गुप्तचर माहिती आहे आणि कोणतेही ठोस पुरावे नाहीत.  त्यांनी गेल्या वर्षी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

"सध्याचे संकट ट्रुडो सरकारच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे निर्माण झाले आहे.'भारताकडून प्रत्यार्पणाच्या २६ विनंत्या कॅनडाकडे एक दशक किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित आहेत, असंही रणधीर जयस्वाल म्हणाले.

Web Title: MEA says Canada failed to act against Lawrence Bishnoi gang despite India's request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.