महामार्गाचे काम केंद्र शासन करणार रक्षा खडसे : सावदा, रावेर, निंभोरा येथे केळीची मोजणी
By admin | Published: March 22, 2016 12:40 AM2016-03-22T00:40:26+5:302016-03-22T00:40:26+5:30
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Next
ज गाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.अजिंठा विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार खडसे म्हणाल्या की, चिखली ते फागणे या टप्प्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे तीन वेळा निविदा काढण्यात आली. मात्र तिन्ही वेळा प्रतिसाद न मिळाला नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आम्ही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या कामासाठी हायब्रीड पद्धतीने काम करण्याचा पर्याय होता. त्यात ४० टक्के शासन व ६० टक्के ठेकेदार असा पर्याय होता. मात्र तो प्रस्तावदेखील रद्द करण्यात आला. त्यामुळे आता संपूर्ण निधीची तरतूद करून केंद्र शासन या रस्त्याचे काम करणार आहे. त्यासाठी काही दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.रेल्वे अभियंत्यांचा प्रश्न लावला मार्गीभुसावळ रेल्वे सह देशभरातील ८० हजार अभियंत्यांना देण्यात आलेला ग्रेड पे व पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. संसदेच्या अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा झाली. रेल्वेमंत्र्यांनी दखल घेत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच वरणगाव फॅक्टरीत प्रशिक्षणार्थी कालावधित काम करणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राअभावी अडचणी येत होत्या. त्याबाबत चर्चा करून तो प्रश्न निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ात होणार केळीची मोजणीजिल्ात केळीचे मोठे क्षेत्र आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेद्वारे केळीची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे व शेतकरी यांचे नुकसान होत होते. शेतकर्यांना ट्रकद्वारे केळीची वाहतुकीसाठी व्यापार्यांवर अवलंबून रहावे लागत होते. या प्रकरणी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करीत जळगाव येथे केळीची मोजणी करण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे आता सावदा, रावेर, निंभोरा या ठिकाणी केळीचा माल मोजता येणार आहे. यापूर्वी हा माल झांसी येथे मोजण्यात येत होता. शेतकर्यांनी बीपीओ ट्रेनची मागणी केली होती. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद रेल्वे विभागाकडून मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी दिल्लीसह संपूर्ण देशभरात आपल्या मालाची विक्री करू शकणार आहे.