व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग रोखण्यासाठी निवडणुकीपूर्वी उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 04:38 AM2018-07-21T04:38:55+5:302018-07-21T04:40:12+5:30
मेसेज प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी निवडणुकीपूर्वी ठोस पावले उचलली जातील, असे व्हॉटसअॅपच्यावतीने निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : मेसेज प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी निवडणुकीपूर्वी ठोस पावले उचलली जातील, असे व्हॉटसअॅपच्यावतीने निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, खोटे वृत्त रोखणारे मॉडेल भारतात आणण्यात येईल. याचा उपयोग अन्य देशांमध्ये केला जात आहे.
व्हॉटसअॅपचा दुरुपयोग रोखण्यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग तथा राजकीय संघटनांसोबत
चर्चा केली आहे.
व्हॉटसअॅपला व्यक्तिगत
आणि छोट्या समूहांमध्ये चर्चेसाठी तयार करण्यात आले आहे. धोकादायक ठरू शकणाºया मेसेजविरुद्ध आम्ही नेहमीच कठोर भूमिका घेतलेली आहे. असे मेसेज पाठविणारी अकाउंट्स बंद केली आहेत, असे कंपनीने नमूद केले.
व्हॉटसअॅपने आयोगाला सांगितले की, त्यांच्या अधिकाºयांचे पथक भारतात अआले असून, ते काही दिवसात धोरण ठरविणाºयांशी चर्चा करेल. खोटे वृत्त रोखण्यासाठी ते भारतात ‘व्हेरिफिकॅडो’हे मॉडेल आणणार आहे. याचा मेक्सिको, ब्राझिलमध्येही उपयोग करण्यात आला आहे.
>फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा
देशभरात खोटे वृत्त आणि अफवांमुळे झालेल्या मारहाण आणि हत्यांच्या घटनांनंतर टीकेचे लक्ष्य झालेल्या व्हॉट्सअॅपने आता मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा एका वेळी पाच करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय मीडिया मेसेजजवळ दिसणारे क्विक फॉरवर्ड बटनही हटविण्यात येणार आहे. अफवा आणि खोट्या मेसेजनंतर जमावाकडून झालेल्या मारहाणीत देशभरात दोन महिन्यांत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अन्य देशांच्या तुलनेत त्यांचे भारतातील यूजर्स अधिक मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवितात. सरकारने कंपनीला बजावले आहे की, अफवा प्रसाराचे माध्यम बनणाºयासही दोषी मानले जाईल आणि बघ्याची भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.