शेवटची घटका मोजताना त्याने तीन शहरातील चौघांना दिले जीवनदान

By admin | Published: April 29, 2016 09:11 AM2016-04-29T09:11:26+5:302016-04-29T09:19:22+5:30

ब्रेनडेड घोषित केलेल्या रुग्णाच्या शरीरातील चार महत्वाच्या अवयवांमुळे मरणाच्या दारात असलेल्या तीन शहरातील चौघांना नव्याने जीवनदान मिळाल्याची अनोखी घटना समोर आली आहे.

By measuring the last factor, he gave to three of the three cities | शेवटची घटका मोजताना त्याने तीन शहरातील चौघांना दिले जीवनदान

शेवटची घटका मोजताना त्याने तीन शहरातील चौघांना दिले जीवनदान

Next

 ऑनलाइन लोकमत 

इंदूर, दि. २९ - डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलेल्या रुग्णाच्या शरीरातील चार महत्वाच्या अवयवांमुळे मरणाच्या दारात असलेल्या तीन शहरातील चौघांना नव्याने जीवनदान मिळाल्याची अनोखी घटना समोर आली आहे. इंदूरमधल्या १८ वर्षाच्या दीपक धाकेता या १८ वर्षाच्या मुलाला बुधवारी संध्याकाळी एसएआयएमएस रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्रेन डेड म्हणून घोषित केले. 
 
डॉक्टरांचा हा  निर्णय धाकेता कुटुंबियांसाठी अत्यंत दु:खद होता. पण त्यांनी वेळेत स्वत:ला सावरत दीपकच्या शरीरातील अवयव गरजू रुग्णांना दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरु झाला ह्दय, लिव्हर आणि दोन किडन्यांचा वेगवान प्रवास. ब्रेन डेड व्यक्तिचे अवयव ज्यावेळी दुसऱ्या व्यक्तिच्या शरीरात वापरण्यासाठी काढण्यात येतात, त्यावेळी अवघा ४ ते ६.३० तासांचा अवधी उपलब्ध असतो. एकेक मिनिट अत्यंत मोलाचं असतं, कारण जर सदर अवयव दुसऱ्या शहरातील रुग्णापर्यंत वेळेत पोचला नाही, तर तो अवयव निकामी होतो. 
 
दीपकच्या दोन किडन्याचे इंदूरमधीलच एसएआयएमस आणि चोईतराम रुग्णालयातील दोन गरजू रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले. दीपकचे ह्दय आणि लिव्हर हवाई मार्गे दिल्लीला पाठवण्यात आले. दिल्ली, गुरगाव आणि इंदूर या व्यस्ततम मार्गावरील विविध यंत्रणांमधील समन्वय आणि चोख नियोजनामुळे गुरुवारी दुपारपर्यंत हे चारही अवयव गरजू रुग्णांच्या शरीरात यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आले. 
 
दीपकच्या ह्दयामुळे अखेरची घटका मोजत असलेल्या एका ४८ वर्षीय महिलेला जीवदान मिळाले. गुरगावच्या मेदांता रुग्णालयात ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली, तर वसंत कुज मार्गावरील आयएलबीएस रुग्णालयातील एका ५५ वर्षीय व्यक्तीवर लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आवश्यक होती. त्या व्यक्तीला दीपकच्या शरीरातील लिव्हर मिळाल्याने नव्याने आयुष्य मिळाले. 
 
प्रत्यारोपण झालेल्या चौघांची प्रकृती आता स्थिर आहे. अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे सर्व अवयव वेळेत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. पण सर्व यंत्रणांनी अचूक समन्वय आणि नियोजन केल्यामुळे मृत्यूच्या दारात असलेल्या चौघांना नव्याने जीवनदान मिळाले. दीपक धाकेता पेशाने वृत्तपत्र विक्रेता होता. 
 

Web Title: By measuring the last factor, he gave to three of the three cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.