पीक आणेवारीची पद्धत बदलणार
By admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30
पीक आणेवारीची पद्धत बदलणार
Next
प क आणेवारीची पद्धत बदलणार-खडसेंची माहिती: उपग्रहाची मदत घेणारमुंबई - राज्यातील पिकाची आणेवारी निित करण्याची विद्यमान पध्दत १०० वर्षे जुनी असून. तीत सुधारणा करण्यात येणार आहे. आणेवारी अचूक निित करता यावी यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून अचूक आर्द्रता मोजणे, जमिनीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज काढणे इत्यादी शिफारशी मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या आहेत. मात्र, या अहवालावर प्रदीर्घ चर्चा करण्याची गरज असल्याने १५ दिवसांत मंत्रिमंडळापुढे अहवाल ठेवला जाईल, अशी माहिती कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.खडसे यावेळी म्हणाले, बीड, उस्मानाबाद, लातूर, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, जालना, अहमदनगर, परभणी या जिल्ातील मिळून ६९ तालुक्यामध्ये टंचाई परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जे जे उपाय करायचे असतात, ते करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. परभणी, नगर व जालना जिल्ात चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आणेवारी जाहीर होण्याची वाट न पाहता टंचाई असलेल्या भागात मागणी केलेल्या ठिकाणी चारा, पाणी व रोजगार देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी निकष शिथिल करण्यात येणार आहेत, असेही खडसे म्हणाले.फळबागांचे पुनरुज्जीवनपावसाअभावी द्राक्ष, पेरु, डाळींब या फळ पिकांच्या बागा सुकून गेल्या असतील तर त्यांच्या पुनर्लागवडीसाठी शासनातर्फे ५० टक्के अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. टंचाईग्रस्त भागात नरेगा/मरेगा च्या अंतर्गत रोजगार उपलब्ध करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले असून रोजगारापोटी मजुरांना द्यावयाची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यात ऑन लाईन पधतीने जमा केली जाणार आहे. चार्याच्या उपलब्धतेसाठी कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, वन विकास मंडळ, शेती महामंडळ यांनी चारा लागवड केली असून वन विभागाकडील सर्व कुरणे राखीव ठेवण्याच्या व त्यांचा लिलाव न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)