२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 06:16 IST2024-05-25T06:15:56+5:302024-05-25T06:16:21+5:30
सक्सेना यांनीही त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल दोन खटले दाखल केले होते.

२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात नर्मदा बचाव आंदोलनाच्या (एनबीए) नेत्या मेधा पाटकर यांना दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले.
महानगरीय दंडाधिकारी राघव शर्मा यांनी पाटकर यांना मानहानीच्या फौजदारी खटल्यात दोषी ठरवले. संबंधित कायद्यानुसार पाटकर यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पाटकर आणि सक्सेना यांच्यात २००० पासून कायदेशीर लढाई सुरू आहे. सक्सेना यांनी नर्मदा बचाव आंदोलन आणि पाटकर यांच्याविरुद्ध जाहिराती प्रकाशित केल्या होत्या. त्यावर आक्षेप घेत पाटकर यांनी खटला दाखल केला होता. सक्सेना तेव्हा अहमदाबादस्थित स्वयंसेवी संस्था नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजचे प्रमुख होते.
सक्सेना यांनीही त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल दोन खटले दाखल केले होते.